नमस्कार ,
" क्रिया प्रतिक्रिया "
अनेक भारतीय स्वतः काहीही " क्रिया " न करता , फक्त आणि फक्त " प्रतिक्रिया " देण्यात ( "उचलली जीभ लावली टाळ्याला" यात ) धन्यता मनात असतात.
अश्या " प्रतिक्रिया " वादी भारतीयांना हि माझी " क्रिया प्रतिक्रिया " कविता सादर .
ही कविता कोणीही चोरण्याचा प्रयत्न करू नये . माझ्या " आजची सत्यगितं " या काव्य संग्रहाहात ही कविता छापली आहे.
" क्रिया प्रतिक्रिया "
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे
घरात बसून प्रतिक्रिया देणं निरर्थक आहे
फक्त स्वतः साठीच जगणं मात्र व्यर्थ आहे
अन्यायाविरुद्ध गप्प बसणं कसं काय तुम्हाला शक्य आहे ?
मी , माझं कुटुंब एवढंच तुमच्या आयुष्याचं सूत्र आहे ?
सभोवतालच्या प्रश्नांकडे कसं काय तुमचं दुर्लक्ष्य आहे ?
अशाने शासन कर्त्यांचं मात्र फावत आहे
कारण जनतेच्या सहनशीलतेची त्यांना कल्पना आहे
जागरूक नागरिक बनणं सगळ्यांचं कर्तव्य आहे
ठराविक नागरिकांनीच लढून सगळे प्रश्न सुटणे कठीण आहे
ज्याला स्वतःच्या हक्काची जाणं आहे
तोच खरा भारतीय नागरिक सुजाण आहे
गप्प बसून सगळं सहन करणं हे काय जिणं आहे ?
विसरू नकात समाजाचं तुम्ही पण काही देणं आहे

कवी : सत्यगीत
( सत्यजित अ शाह )
No comments:
Post a Comment