Tuesday, November 1, 2016

" ठाणे वाहतूक पोलिसांचे कौतुक " ( THANE TRAFFIC POLICE , THANK YOU )



नमस्कार , सुंदर सकाळ ,
" ठाणे वाहतूक पोलिसांचे कौतुक " ( THANE TRAFFIC POLICE )
या सोबत मी छायाचित्रे जोडली आहेत.
मंदार जोशी , या माझ्या ठाणे येथील मित्राच्या घरी आज , मंगळवार , ०१. ११. २०१६ रोजी ठाणे वाहतूक पोलिसांकडून टपालाने ( POST ने ) हि तिनही छायाचित्रे ली .   
मंदार जोशी  याला  ठाणे वाहतूक पोलीस शाखेच्या या उपक्रमाचे फार कौतुक वाटले .
तो उप आयुक्त - वाहतूक शाखा - ठाणे ( DCP - TRAFFIC THANE ) यांना प्रत्यक्षात भेटून त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांना धन्यवाद देणार आहे.
जर या प्रमाणे प्रत्येक भारतीयाने , मग तो श्रीमंत असो , गरीब असो , नगरसेवक असो , आमदार असो , खासदार असो , मंत्री असो ,  गल्ली अध्यक्ष असो , चाळ अध्यक्ष असो , विभाग अध्यक्ष असो , शहर अध्यक्ष असो , तालुका अध्यक्ष असो , जिल्हा अध्यक्ष असो , राज्य अध्यक्ष असो , पक्ष कार्यकर्ता असो , नगरसेवकाचा मुलगा असो , आमदाराचा मुलगा असो , खासदारांचा मुलगा असो , वाहतूक  पोलीस असो , खाकी पोलीस असो , शासकीय कर्मचारी असो , अशिक्षित असो , सुशिक्षित असो  , प्रत्येकाने मंदार जोशी सारखं वाहतुकीचा प्रत्येक  नियम पाळला तर ( येथे त्याने दुचाकी चालिवताना शिरस्त्राण वापरले ) , भारतातील अपघाताचे प्रमाण कमी होईल , वाहतुकीत शिस्त येईल , पोलिसांचे काम कमी होईल.
मी एक ठाणेकर म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांचे मनापासून कौतुक करू इच्छितो .
भारतियांनो जागे व्हा. खोटा अभिमान सोडा  , खोटी गुर्मी सोडा , वाहतुकीचे सगळे नियम स्वतः  पाळा. इतरांना देखील वाहतुकीचे सगळे नियम पाळण्यास उद्दयुक्त करा

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 






No comments:

Post a Comment