" तोंड दाबून " भटक्या कुत्र्यांचा " मार "
काय
म्हणालात हि " म्हण " चुकीची आहे ? अहो पण मी कोठे " म्हणालो " कि हि
म्हण बरोबर आहे ? ज्याप्रमाणे जगातील अनेक गोष्टी बदलत आहेत त्याच प्रमाणे
म्हणी देखील काळानुसार बदलणार . कृपया हे छायाचित्र नीट पहा . यात तुम्हाला कचऱ्याच्या उंच अश्या डब्यातील कचरा जमिनीवर पडलेला नव्हे पसरलेला दिसत आहे . हे चित्र दररोज सकाळी आमच्या इमारतीमध्ये दिसते. आमच्या इमारतीच्या मध्ये एक मोकळा चौक आहे , त्यात दिवसभर जमा झालेला कचरा , दिवस येणाऱ्या घंटा गाडीला देण्यासाठी जमा केला जातो.
रात्रीच्या वेळी आमच्या इमारतीमधील भटके कुत्रे ( अंदाजे ७ ते १० ) , दररोज , नित्य नियमाने त्या कचऱ्याच्या पेट्या पाडून हे सगळं करतात. हा त्रास कमी वाटतो म्हणून कि काय जागो जागी भटक्या कुत्र्यांचे मल मूत्र पडलेले दिसते. गावी म्हणे अंगणात शेणाचा सडा शिंपडला जायचा., तसेच काहीसे आमच्या येथे अजूनही होते, फरक एवढाच आहे कि हा शिंपडलेला सडा भटक्या कुत्र्यांच्या मल मूत्राचा असतो . दुचाकींच्या आसनाची फाडाफाड झालेली दिसून येते .
आतल्या गोटातून असे कळते कि गेल्या वर्षभरात ठाणे म न पा हद्दीत भटक्या कुत्र्यांच्या नगण्य अश्या निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत . त्याचप्रमाणे काही ठराविक व्यक्ती प्राणी प्रेमाचा जो अतिरेक करतात , त्यामुळे ९९.00 % नागरिकांना गप्प बसावे लागते .
म्हणूनच " तोंड दाबून " भटक्या कुत्र्यांचा " मार " हि आधुनिक म्हण जन्माला आली.
Stop Feeding Stray
Dogs, Rather Adopt
them .
Make INDIA – A COUNTRY Free From Stray Dog
Bites.
Stand up for what is right , Even if
you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet
No comments:
Post a Comment