Sunday, November 27, 2016

भविष्यातील भारत

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,

" भविष्यातील भारत "

आपल्याला माहीतच असेल कि " भारत " या देशात भटक्या कुत्र्यांची संख्या भयावह अश्या वेगाने वाढत आहे.
२२. ११. २०१६ च्या " लोकमत " या वृत्त पत्रातील " नागपूर " पुरवणी मधील हि बातमी वाचा .

दुर्दैवाची गोष्ट आहे कि " भारत " या देशातील बहुसंख्य नगरपालिका , महानगर पालिका यांच्याकडून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण योग्य प्रमाणात योग्य प्रमाणे होत नाही .

जर असेच दुर्लक्ष्य " भटक्या कुत्र्यांच्या भयावह अश्या वेगाने वाढणाऱ्या संन्ख्येवर" झाले तर भविष्यात भारत या देशात असे दृश्य दिसू शकेल.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Evil Triumphs When Good People Sit Quiet 




Wednesday, November 16, 2016

चित्र विचित्र वाहन क्रमांक पाट्या ( HORRIBLE NUMBER PLATES ) - एक हाता बाहेर जात असलेला व दुर्लक्षिलेला प्रश्न

चित्र विचित्र वाहन क्रमांक पाट्या ( HORRIBLE NUMBER PLATES ) - एक हाता बाहेर जात असलेला व दुर्लक्षिलेला प्रश्न


“ MH 03 BZ KK” असा एक जरासा विचित्र असा वाहन क्रमांक लिहिलेली वाहन क्रमांक पाटी असलेले एक चार चाकी वाहन मुंबई मध्ये बिनधास्तपणे फिरत आहे.

या वाहनावर, त्याचप्रमाणे वाहन क्रमांक पाटीवर एका भारतीय राजकीय पक्षाचे चिन्ह लावले आहे.

हा वाहन क्रमांक तुम्हाला ओळखू येतो ?

मला एक गहाण प्रश्न पडला आहे कि अश्या गाड्या जागो जागी दिसून येतात पण या कडे वाहतूक पोलीस , त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे कसे काय लक्ष्य जात नाही ?

या विरुद्ध देखील surgical strike करण्याची नितांत गरज आहे.


Sunday, November 13, 2016

भटक्या कुत्र्यांचं करायचं काय ? - STRAY DOG MENACE

नमस्कार , सुंदर दुपार ,

" भटक्या कुत्र्यांचं करायचं काय ?  "

रविवार , १३. ११. २०१६ च्या " महाराष्ट्र टाईम्स " मधील श्री. नितीन चव्हाण यांनी  लिहिलेला " भटक्या कुत्र्यांचं करायचं काय ?  " हा एक अभ्यास पूर्ण लेख येथे देत आहे.

प्रसार माध्यमे देखील या जाटील प्रश्नावर टाहो फोडत आहेत , तरीही दुर्दैवाने शासन यंत्रणेला याची जाणीव का होत नाही याचे मला उत्तर मला मिळालेले नाही .
या  " भटक्या कुत्र्यांच्या अति भयानक वेगाने वाढणाऱ्या संख्येवर " शासन surgical strike कधी करणार याची मी वाट पाहत आहे.

Stop Feeding Stray Dogs, Rather Adopt them .  

Make INDIA  – A COUNTRY  Free From Stray Dog Bites.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 



Wednesday, November 9, 2016

तोंड दाबून " भटक्या कुत्र्यांचा " मार

" तोंड  दाबून " भटक्या कुत्र्यांचा " मार "
काय म्हणालात हि " म्हण "  चुकीची आहे ? अहो पण मी कोठे " म्हणालो " कि हि  म्हण  बरोबर आहे ? ज्याप्रमाणे जगातील अनेक गोष्टी बदलत आहेत त्याच प्रमाणे म्हणी देखील काळानुसार बदलणार .

कृपया हे छायाचित्र नीट पहा . यात तुम्हाला कचऱ्याच्या उंच अश्या डब्यातील कचरा जमिनीवर  पडलेला नव्हे पसरलेला दिसत आहे . हे चित्र दररोज सकाळी आमच्या इमारतीमध्ये दिसते. आमच्या इमारतीच्या मध्ये एक मोकळा चौक आहे , त्यात दिवसभर जमा झालेला कचरा , दिवस येणाऱ्या घंटा गाडीला देण्यासाठी जमा केला जातो.

रात्रीच्या वेळी आमच्या इमारतीमधील भटके कुत्रे ( अंदाजे ७ ते १० ) , दररोज , नित्य नियमाने त्या कचऱ्याच्या पेट्या पाडून हे सगळं करतात. हा त्रास कमी वाटतो म्हणून कि काय जागो जागी भटक्या कुत्र्यांचे मल मूत्र पडलेले दिसते. गावी म्हणे अंगणात शेणाचा सडा शिंपडला जायचा., तसेच काहीसे  आमच्या येथे अजूनही होते, फरक एवढाच आहे कि हा शिंपडलेला सडा भटक्या कुत्र्यांच्या मल मूत्राचा असतो .  दुचाकींच्या आसनाची फाडाफाड झालेली दिसून येते .

आतल्या गोटातून असे कळते कि गेल्या वर्षभरात ठाणे म न पा हद्दीत भटक्या कुत्र्यांच्या नगण्य अश्या निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत . त्याचप्रमाणे काही ठराविक व्यक्ती  प्राणी प्रेमाचा जो अतिरेक करतात , त्यामुळे ९९.00 % नागरिकांना गप्प बसावे लागते .

म्हणूनच " तोंड  दाबून " भटक्या कुत्र्यांचा " मार "  हि आधुनिक म्हण जन्माला आली.

Stop Feeding Stray Dogs, Rather Adopt them .  

Make INDIA  – A COUNTRY  Free From Stray Dog Bites.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 



Monday, November 7, 2016

विचित्र वाहन क्रमांक पाट्या

नमस्कार ,
या प्रकारच्या वाहन क्रमांक पाट्या आजकाल अनेक ठिकाणी दिसून येतात .
गम्मत अशी आहे कि या कडे वाहतूक पोलीस ( TRAFFIC POLICE ) ,
 
प्रादेशिक परिवहन कार्यालय ( RTO ) यांना मात्र हे कधीच दिसून येत नाही . 

असं ऐकले जाते कि भारत एक महासत्ता होऊ घातली आहे . अशी ? 
 
 

जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस - ७ जणांना चावा घेतल्यानं नागरिकांत घबराट

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,
जळगाव : शहरात मोकाट  कुत्र्यांचा हैदोस - ७ जणांना चावा घेतल्यानं नागरिकांत घबराट
०७. ११. २०१६ रोजी , " IBN लोकमत " या वृत्तचित्रवाहिनीवर १९.३१  वाजता , दूरचित्रवाणी संचाच्या खालील बाजूस ज्या धावत्या पट्ट्यांमध्ये बातम्या जात असतात , त्यात हि वरील बातमी दाखवली .
थोड्याफार प्रमाणात हीच परिस्थिती , मुंबई , नागपूर , पुणे , ठाणे , डोंबिवली , कल्याण , अंबरनाथ , उल्हासनगर , नाशिक , सांगली , सोलापूर , खेड , औरंगाबाद , अश्या व इतर अनेक शहरे , गावे , तालुके येथे आढळून येते .
आपल्याला माहीत नसेल कि " महाराष्ट्र " नावाच्या राज्यात दररोज अंदाजे ७,७०० मानव प्राण्यांना " श्वान दंश "  होतो . श्वान दंशावर खाजगी डॉक्टर , खाजगी रुग्णालये खाजगी दवाखाना यांच्याकडे श्वान दंशावर उपचार घेणाऱ्यांची नोंद शासन दरबारी नसते.
त्याच प्रमाणे " भारत " नावाच्या देशात दररोज अंदाजे १,४१,९७०  मानव प्राण्यांना " श्वान दंश "  होतो .

Stop Feeding Stray Dogs, Rather Adopt them

Make INDIA  – A COUNTRY  Free From Stray Dog Bites.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet






Wednesday, November 2, 2016

फलाट आणि लोकल च्या डब्यात एवढे अंतर का ?

नमस्कार ,

फलाट आणि लोकल च्या डब्यात एवढे अंतर का ?

काही दिवसांपूर्वी आमच्या व्यवसायाशी निगडित असलेला एक परदेशी व्यावसायिक ( BUSINESSMAN ) , भारत भेटीवर पहिल्यांदा आला होता. त्याला मुंबईतील लोकल गाड्यांचे अप्रूप होते. त्याला रविवारी छत्रपती शिवाजी टर्मिनस ( C S T ) या लोकल सुटण्याच्या प्रथम स्थानकावर नेले होते व CST ते मस्जिद व पुन्हा CST हा लोकल ने प्रवास करवून आणला ( विना तिकीट नाही , तर तिकीट काढून ) .

येथे तो फलाटावरून लोकल मध्ये चढतानाचे छायाचित्र जोडले आहे. त्याने मला विचारलेल्या एका प्रश्नाचे माझ्याकडे उत्तर नव्हते . तो प्रश्न होता " लोकल आणि फलाट यात एवढे जास्त अंतर का आहे ? " . त्याला मी एकच सांगितले कि अजून काही प्रश्न विचारू नकोस कारण माझ्याकडे अश्या प्रश्नांची उत्तरे नाहीत .

बोला तुमच्या कडे आहे याचे उत्तर ?

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet

 

Tuesday, November 1, 2016

" ठाणे वाहतूक पोलिसांचे कौतुक " ( THANE TRAFFIC POLICE , THANK YOU )



नमस्कार , सुंदर सकाळ ,
" ठाणे वाहतूक पोलिसांचे कौतुक " ( THANE TRAFFIC POLICE )
या सोबत मी छायाचित्रे जोडली आहेत.
मंदार जोशी , या माझ्या ठाणे येथील मित्राच्या घरी आज , मंगळवार , ०१. ११. २०१६ रोजी ठाणे वाहतूक पोलिसांकडून टपालाने ( POST ने ) हि तिनही छायाचित्रे ली .   
मंदार जोशी  याला  ठाणे वाहतूक पोलीस शाखेच्या या उपक्रमाचे फार कौतुक वाटले .
तो उप आयुक्त - वाहतूक शाखा - ठाणे ( DCP - TRAFFIC THANE ) यांना प्रत्यक्षात भेटून त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांना धन्यवाद देणार आहे.
जर या प्रमाणे प्रत्येक भारतीयाने , मग तो श्रीमंत असो , गरीब असो , नगरसेवक असो , आमदार असो , खासदार असो , मंत्री असो ,  गल्ली अध्यक्ष असो , चाळ अध्यक्ष असो , विभाग अध्यक्ष असो , शहर अध्यक्ष असो , तालुका अध्यक्ष असो , जिल्हा अध्यक्ष असो , राज्य अध्यक्ष असो , पक्ष कार्यकर्ता असो , नगरसेवकाचा मुलगा असो , आमदाराचा मुलगा असो , खासदारांचा मुलगा असो , वाहतूक  पोलीस असो , खाकी पोलीस असो , शासकीय कर्मचारी असो , अशिक्षित असो , सुशिक्षित असो  , प्रत्येकाने मंदार जोशी सारखं वाहतुकीचा प्रत्येक  नियम पाळला तर ( येथे त्याने दुचाकी चालिवताना शिरस्त्राण वापरले ) , भारतातील अपघाताचे प्रमाण कमी होईल , वाहतुकीत शिस्त येईल , पोलिसांचे काम कमी होईल.
मी एक ठाणेकर म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांचे मनापासून कौतुक करू इच्छितो .
भारतियांनो जागे व्हा. खोटा अभिमान सोडा  , खोटी गुर्मी सोडा , वाहतुकीचे सगळे नियम स्वतः  पाळा. इतरांना देखील वाहतुकीचे सगळे नियम पाळण्यास उद्दयुक्त करा

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet