नमस्कार
,
सुंदर
सकाळ ,
"
आजचा भारतीय "
हे
एक व्यंगचित्र पहा . मी यास " व्यंगचित्र " न म्हणता भारताचे “ दुर्दैवी
सत्य चित्र “ म्हणेन .
थोडक्यात
पण अगदी अचूक असे “आजच्या भारतीयाचे “ वर्णन या एका चित्रात केले आहे.
मराठीत
समजावतो. :
चित्र
पहिले : - व्यासपीठावरील नेता / वक्ता विचारतो कि तुमच्यापैकी कोणाला बदल हवा
आहे ? सगळे श्रोते हात वर करतात.
चित्र
दुसरे : - त्यानंतर तो नेता / वक्ता विचारतो, मग कोण कोण बदल घडवणार ?
एकही हात वर होत नाही. आणि सगळ्या श्रोत्यांचा चेहरा कडूलिंबाचा रस प्याल्यासारखा
होतो.
सध्या
भारतात हेच आणि हेच होत आहे. FACEBOOK वर अनेक व्यक्ती घरात बसून , फार मोठ मोठ्ठ्या
" प्रतिक्रिया " अगदी तावा तावाने / त्वेषाने / स्फूर्तीने अनेक
गोष्टींवर , घटनांवर , POST वर देत असतात. पण " क्रिया " करायला मात्र कोणीच
तयार नसतात. जेंव्हा क्रिया करा अशी विनंती त्यांना केली जाते तेंव्हा ते ज्या वेगाने
" प्रतिक्रिया " देतात , त्यापेक्ष्या पाच पट वेगाने MR . INDIA (
गायब ) होतात.
मी
भटक्या कुत्र्यांच्या वाढत चाललेल्या प्रश्नावर गेली ५ एक वर्षे लढत आहे. एकदा मी फेसबुक
वर टाकलेल्या POST ला एका गृहिणीने प्रतिक्रिया दिली कि त्यांच्या मुलांना अजून भटका
कुत्रा चावला नाही . त्यामुळे त्या या प्रश्नावर कश्या लढणार ? याला मी काय उत्तर देणार
? म्हणजे स्वतःवर संकट ओढ्विल्याशिवाय कोणत्याच सामाजिक प्रश्नावर लढायचे नाही
/ आवाज उठवायचा नाही हि वृत्ती फार बळावत चालली आहे.
याच
आशयाची " आजचा भारतीय " नावाची मी लिहिलेलेइ एक कविता येथे देत आहे.
हि कविता माझ्या " आजची सत्यगीतं " या काव्यसंग्रहातील आहे.
तात्पर्य : आज भारताला " प्रतिक्रिया " नको " क्रिया
" हवी .
Stand up for
what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs
When Good People Sit Quiet
सत्यजित
अ शाह - ठाणे - satyajitshah64@gmail.com
एका अति सामान्य पण जागरूक
नागरिक
No comments:
Post a Comment