Friday, February 26, 2016

" मराठीचे इंग्रजीकरण " - मराठी मधील इंग्रजीचे अतिक्रमण - " लोकप्रभा " ४.३.२०१६ मधील लेख

" मराठीचे इंग्रजीकरण "
नमस्कार ,
२७.फेब्रुवारी हा जागतिक मराठी दिवस म्हणून साजरा केला जातो. उद्या , शनिवार , २७ फेब्रुवारी, २०१६ रोजी FACEBOOK वर “ GOOD MORNING FRIENDS. WISHING YOU A VERY HAPPY WORLD MARATHI DAY “ अस कोणी POST केल अथवा लिहील तर आश्चर्यचकित होऊ नकात कारण हे आणि हेच आजचे मराठी आहे. अश्याच वेगाने मराठी भाषेचे इंग्रजीकरण होत चालले आहे. काय म्हणालात सिद्ध ( आजच्या मराठीत PROVE ) करू ?
ठीक आहे .
- आपण कोणत्याही दोन मराठी व्यक्तींचे संभाषण जर ऐकले तर त्यात अंदाजे ४० ते ७० % एवढे इंग्रजी शब्द सर्रास पणे वापरले जातात.
- दूरचित्रवाणी वरील कोणत्याही मराठी वाहिनीवरील कोणतीही मराठी मालिका लक्ष्य देऊन पहा , त्यातील संवादांमध्ये देखील ४० ते ७० % एवढे इंग्रजी शब्द सर्रास पणे वापरले जातात.
अजूनही पटत नसेल तर कृपया " लोकप्रभा " च्या ४.३.२०१६ च्या अंक मध्ये छापून आलेला व मी लिहिलेला " मराठीचे इंग्रजीकरण " हा लेख वाचा. तो या सोबत जोडत आहे ( ATTACHMENT ) .
कधी इंग्रजी बोलताना कोणाला COME ON WE WILL HAVE जेवण , असे ऐकले आहे का ? पण दोन मराठी व्यक्ती मात्र हमखास " अरे चल LUNCH ला जाऊया असे म्हणतात.
दुसरे उदाहरण “ जरा HAIRCUT करून येतो “ असे मराठी माणूस म्हणतो . त्या ऐवजी “ केस कापून “ असे का नाही म्हणत.
अजून एक भन्नाट वाक्य अरे मी " टाईमावर " आलो होतो. " टाईमावर " हा शब्द कोणत्या शब्दकोशात आहे ?
आता या दूरचित्रवाणी वरील काही मराठी जाहिराती
- जो पर्यंत तुम्ही तुमच्या WIFE ला सांगाल कि तुम्हाला ACIDITY आहे , तोपर्यंत ENO ............. आपले काम करेल.
- तुम्हाला माहित आहे का , तुमच्या HONEY मध्ये FIFTY PERCENT SUGAR आहे.
अहो आजकाल "मराठी" संवादामध्ये दुर्बीण घेऊन "मराठी" शोधावी लागते .
असो, श्रि. अमिताभ बच्चन अथवा श्रि. अनुपम खेर हे हिंदी बोलताना शुध्द हिंदीतच बोलतात . इंग्रजीच्या कुबड्या घेत नाहित. मग मराठी माणसालाच इंग्रजीच्या कुबड्या का लागतात ?
यावर उपाय म्हणून मी नेहमी वापरले जाणारे इंग्रजी शब्द व त्यांना सोप्पे पर्यायी मराठी शब्द असा शब्द कोश बनवणे चालू केला आहे. आश्चर्य म्हणजे गेल्या ६ महिन्यात अंदाजे १८०० शब्द लिहून झाले आहेत. पोटा पाण्याचा व्यवसाय सांभाळून हे सगळ करीत असतो .
माझे असे म्हणणे आहे कि प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी पर्यायी शब्द मिळू शकणार नाही . उदाहरणार्थ - LAPTOP , FACEBOOK , WHATSAPP वगैरे . पण अकारण इंग्रजी का वापरले जातेय ?
माझे विचार वाचून चीड आली असेल तर मला माफ करा. पण मातृभाषेची हि दयनीय अवस्था पाहवत नाहि.
सत्यजित अ शाह - ठाणे
एक अतिसामान्य पण जागरूक नागरिक


Sunday, February 14, 2016

आजचा भारतीय / TODAY's INDIAN

नमस्कार ,

सुंदर सकाळ ,

" आजचा भारतीय "

हे एक व्यंगचित्र पहा . मी यास " व्यंगचित्र " न म्हणता भारताचे “ दुर्दैवी सत्य  चित्र “ म्हणेन .

थोडक्यात पण अगदी अचूक असे  “आजच्या भारतीयाचे “ वर्णन  या एका चित्रात केले आहे.

मराठीत  समजावतो. :

चित्र पहिले : - व्यासपीठावरील नेता / वक्ता  विचारतो कि तुमच्यापैकी कोणाला बदल हवा आहे ? सगळे श्रोते हात वर करतात.

चित्र दुसरे : - त्यानंतर तो नेता / वक्ता  विचारतो,  मग कोण कोण बदल घडवणार ? एकही हात वर होत नाही. आणि सगळ्या श्रोत्यांचा चेहरा कडूलिंबाचा  रस प्याल्यासारखा  होतो.

सध्या भारतात हेच आणि हेच होत आहे. FACEBOOK वर अनेक व्यक्ती घरात बसून ,  फार मोठ मोठ्ठ्या  " प्रतिक्रिया " अगदी तावा तावाने / त्वेषाने / स्फूर्तीने  अनेक गोष्टींवर , घटनांवर , POST वर देत असतात. पण " क्रिया " करायला मात्र कोणीच तयार नसतात. जेंव्हा क्रिया करा अशी विनंती त्यांना केली जाते तेंव्हा ते ज्या वेगाने " प्रतिक्रिया " देतात , त्यापेक्ष्या पाच पट वेगाने MR .  INDIA ( गायब ) होतात.

मी भटक्या कुत्र्यांच्या वाढत चाललेल्या प्रश्नावर गेली ५ एक वर्षे लढत आहे. एकदा मी फेसबुक वर टाकलेल्या POST ला एका गृहिणीने प्रतिक्रिया दिली कि त्यांच्या मुलांना अजून भटका कुत्रा चावला नाही . त्यामुळे त्या या प्रश्नावर कश्या लढणार ? याला मी काय उत्तर देणार ? म्हणजे स्वतःवर संकट ओढ्विल्याशिवाय कोणत्याच सामाजिक  प्रश्नावर लढायचे नाही / आवाज उठवायचा नाही हि वृत्ती फार बळावत चालली आहे.

याच आशयाची " आजचा भारतीय " नावाची मी लिहिलेलेइ  एक कविता येथे देत आहे. हि कविता माझ्या " आजची सत्यगीतं " या काव्यसंग्रहातील आहे.

तात्पर्य : आज भारताला " प्रतिक्रिया " नको " क्रिया " हवी .

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 


सत्यजित अ शाह - ठाणे -  satyajitshah64@gmail.com

एका अति सामान्य पण जागरूक नागरिक