नमस्कार ,
गेली अनेक वर्षे , अनेक कारणांनी गाजत असलेल्या ठाणे पश्चिम , महाराष्ट्र येथील कापुरबावडी उड्डाणपुलाच्या मुंबई कडे जाणाऱ्या मार्गीकेचे अधिकृत उदघाटन आज , १७ ऑगस्ट, २०१५ ला झाले. मला या उदघाटनाबद्दल काहीही बोलायचे नाही.
मला ठाणेकरांना या उड्डाण पुलावरून अतिशय सावध , सावकाश गाडी चालवा हि कळकळीची विनंती करायची आहे.
या उड्डाणपुलाचा मी स्वतः त्यावर पायी फिरून काही धोकादायक ठिकाणांचा अभ्यास केला आहे. यासोबत काही छायाचित्रे जोडत आहे.
पहिल्या छायाचित्रात जी धोकादायक ठिकाणे / वळणे आहेत त्याबद्दल आकृती काढून दाखविले आहे.
पहिल्या छायाचित्रात जी धोकादायक ठिकाणे / वळणे आहेत त्याबद्दल आकृती काढून दाखविले आहे.
जेव्हा आपण घोडबंदर रोड हून हा उड्डाणपूल चढतो तेंव्हा थोड्या अंतरावर डावीकडून बिग बझार येथून एक मार्गिका येवून मिळते. जेथे या दोन मार्गिका मिळतात ती पहिली धोकादायक जागा आहे.
त्यानंतर ती मार्गिका पुढे अक्षरशः डावीकडे ९० अंशाच्या कोनात वळतो . हि दुसरी धोकादायक जागा / वळण आहे. येथे या अगोदरच भयानक अपघात झाले आहेत.
त्यानंतर थोड्या अंतरावर मुंबई कडे जाण्यासाठी एक मार्गिका अक्षरशः १८० अंशाच्या कोनात उजवीकडे वळते ( SHARP RIGHT U TURN ) . हे वळण तर अति धोकादायक आहे. हि झाली तिसरी धोकादायक जागा. कृपया छायाचित्रे पहा. एका छायाचित्रा मध्ये चक्क त्या धोकादायक वळणावर " SHARP TURN " अशी पाटी अगोदरच लावली आहे.
या धोकादायक १८० अंशाच्या कोनात उजवीकडे वळल्यावर ती मुंबई कडे जाणारी मार्गिका , नाशिक हून मुंबई कडे जाणाऱ्या जुन्या उड्डाण पुलाच्या मार्गिकेला अति धोकादायक अशी येवून मिळते. हि आहे चौथी धोकादायक जागा.
तेंव्हा या अश्या आगळ्या वेगळ्या कापुरबावडी उड्डाणपुलावरून प्रवास करू इच्छीणाऱ्या भारतीयांनो कृपया आतिशय सावधगिरीने व हळू वेगाने दुचाकी अथवा चार चाकी चालवा.
लक्षात घ्या कि दुर्दैवाने अपघात झाला तर आपल्याला शासनाकडून काहीही मदत मिळण्याची शक्यता नाही.
मी या अगोदर अनेक वेळा मुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य यांना या कापूर बावडी उड्डाणपुलाच्या धोकादायक गोष्टींबद्दल कळविली आहे.
No comments:
Post a Comment