Monday, August 17, 2015

Dangerous , Accident-prone Spots on Kapurbavdi Flyover - कापुरबावडी उड्डाण पुलावरील धोकादायक ठिकाणे

नमस्कार ,
गेली अनेक वर्षे , अनेक कारणांनी गाजत असलेल्या ठाणे पश्चिम , महाराष्ट्र येथील कापुरबावडी उड्डाणपुलाच्या मुंबई कडे जाणाऱ्या मार्गीकेचे अधिकृत उदघाटन आज , १७ ऑगस्ट, २०१५ ला झाले. मला या उदघाटनाबद्दल काहीही बोलायचे नाही.
मला ठाणेकरांना या उड्डाण पुलावरून अतिशय सावध , सावकाश गाडी चालवा हि कळकळीची विनंती करायची आहे.
या उड्डाणपुलाचा मी स्वतः त्यावर पायी फिरून काही धोकादायक ठिकाणांचा अभ्यास केला आहे. यासोबत काही छायाचित्रे जोडत आहे.
पहिल्या छायाचित्रात जी धोकादायक ठिकाणे / वळणे आहेत त्याबद्दल आकृती काढून दाखविले आहे.
जेव्हा आपण घोडबंदर रोड हून हा उड्डाणपूल चढतो तेंव्हा थोड्या अंतरावर डावीकडून बिग बझार येथून एक मार्गिका येवून मिळते. जेथे या दोन मार्गिका मिळतात ती पहिली धोकादायक जागा आहे.
त्यानंतर ती मार्गिका पुढे अक्षरशः डावीकडे ९० अंशाच्या कोनात वळतो . हि दुसरी धोकादायक जागा / वळण आहे. येथे या अगोदरच भयानक अपघात झाले आहेत.
त्यानंतर थोड्या अंतरावर मुंबई कडे जाण्यासाठी एक मार्गिका अक्षरशः १८० अंशाच्या कोनात उजवीकडे वळते ( SHARP RIGHT U TURN ) . हे वळण तर अति धोकादायक आहे. हि झाली तिसरी धोकादायक जागा. कृपया छायाचित्रे पहा. एका छायाचित्रा मध्ये चक्क त्या धोकादायक वळणावर " SHARP TURN " अशी पाटी अगोदरच लावली आहे.
या धोकादायक १८० अंशाच्या कोनात उजवीकडे वळल्यावर ती मुंबई कडे जाणारी मार्गिका , नाशिक हून मुंबई कडे जाणाऱ्या जुन्या उड्डाण पुलाच्या मार्गिकेला अति धोकादायक अशी येवून मिळते. हि आहे चौथी धोकादायक जागा.
तेंव्हा या अश्या आगळ्या वेगळ्या कापुरबावडी उड्डाणपुलावरून प्रवास करू इच्छीणाऱ्या भारतीयांनो कृपया आतिशय सावधगिरीने व हळू वेगाने दुचाकी अथवा चार चाकी चालवा.
लक्षात घ्या कि दुर्दैवाने अपघात झाला तर आपल्याला शासनाकडून काहीही मदत मिळण्याची शक्यता नाही.
मी या अगोदर अनेक वेळा मुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य यांना या कापूर बावडी उड्डाणपुलाच्या धोकादायक गोष्टींबद्दल कळविली आहे.









Tuesday, August 11, 2015

Thank you " मी मराठी " , " IBN लोकमत " & " Z मराठी "

नमस्कार ,
मी या द्वारे " मी मराठी " , " IBN लोकमत " व " Z मराठी " या वाहिन्यांचे कौतुक करणार आहे. कारण हि तसेच आहे.
हि ३ छायाचित्रे पहा.
१. ) पहिले छायाचित्र आहे " मी मराठी " या वृत्त वाहिनीवरील " खाऊ गल्ली " या कार्यक्रमातील. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध मराठी कलाकार श्री. अंशुमन विचारे हे दु चाकी वरून वेगवेगळ्या उपहार गृहाची सफर घडवीत असतात. महत्वाचे म्हणजे ते दुचाकीवर शिरस्त्राण ( HELMET ) घालूनच असतात . ते एवढे सुप्रसिद्ध कलाकार असूनही शिरस्त्राण घालतात याचे फार कौतुक वाटते. या दुचाकी वर शिरस्त्राण घालण्यासाठी मी श्री. अंशुमन विचारे व " मी मराठीचे " Editor-in-chief श्री. रवींद्र आंबेकर यांचे मनापासून धन्यवाद व अभिनंदन करू इच्छितो.
२. ) दुसरे छायाचित्र हे " IBN लोकमत " या वृत्त वाहिनीवरील " डबल सीट " या चित्रपटावरील SPECIAL SHOW मधील आहे. या कार्यक्रमात " मुक्ता बर्वे " या आजच्या आघाडीच्या मराठी चित्रपटांतील नायिका व कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका " नीलिमा कुलकर्णी " या दोघींनी वेगवेगळ्या दुचाकीवरून फेरफटका मारता मारता कार्यक्रम सदर केला. महत्वाचे म्हणजे त्या दोघींनी दुचाकी चालविताना शिरस्त्राण घातले होते. त्या साठी मी त्या दोघींचे मनापासून धन्यवाद व अभिनंदन करू इच्छितो.
३. ) तिसरे छायाचित्र हे " Z मराठी " या मराठी वाहिनीवरील " नंदा सौख्य भरे " या कार्यक्रमातील आहे. या छायाचित्रातील दृश्यात आपण पाहू शकता कि दोन स्त्री कलाकार या दुचाकीवर आहेत आणि दोघींनीही शिरस्त्राण घातले आहे. या साठी मी त्या दोन्ही स्त्री कलाकारांचे , या मालिकेच्या निर्मात्यांचे व दिग्दर्शकाचे मनापासून धन्यवाद व अभिनंदन करू इच्छितो.
या प्रमाणे जर भारत नामक देशातील प्रत्येक व्यक्तीने , ज्यात नेते, अभिनेते, राजकारणी , राजकीय पक्षांचे कार्यकर्ते , तरुण मंडळी , सामान्य नागरिक या सगळ्यांनीच दुचाकीवर शिरस्त्राण घालणे , आसन पट्टा ( SEAT BELT ) लावणे , वाहनावर चित्र विचित्र पद्धतीने वाहन क्रमांक न लिहिणे , गाडीला काळ्या कुट्ट काचा न लावणे , चित्र विचित्र आवाजाचे HORN न लावणे हे व इतर सगळे वाहतुकीचे सगळे नियम पाळले पाहिजेत.
नीट विचार करा . तुम्हाला काय वाटते ? मी तर गेली ३ वर्षे ठाणे येथील पोलिसांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत या साठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. माझं हे म्हणण DCP TRAFFIC यांना पटले आहे. आपला मला पाठींबा आहे का ?
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet