Thursday, February 18, 2010
Sunday, February 14, 2010
news about polluting industires from industrial area of DOMBIVLI appeared in Maharashtra Times dt. 15th Feb. 2010.
ठाणे + कोकण
डोंबिवलीतील आणखी ७ कंपन्या बंद
15 Feb 2010, 0425 hrs IST
प्रदूषणाकडे केलेले दुर्लक्ष भोवले
म. टा. प्रतिनिधी
डोंबिवलीतील प्रदूषणाला जबाबदार धरत ८ कंपन्या बंद करण्याची कारवाई होऊन १५ दिवसही उलटत नाहीत तोच आणखी ७ कंपन्यांवर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने बडगा उगारला आहे. या कंपन्यांचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचा आदेश मंडळाने एमआयडीसीला दिला असल्याने तेथील उत्पादन बंद झाले आहे.
डोंबिवलीतील प्रदूषणाच्या घातक स्तरामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा अहवाल केंद सरकारने दिला होता. या अहवालानंतरसुद्धा स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी केवळ आपली हतबलता व्यक्त करत असल्याने एक दिवस डोंबिवलीचा भोपाळ होण्याची भीती व्यक्त होऊ लागली होती. परंतु शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांनी केंदीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची भेट घेऊन येथील प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करावी, अशी मागणी केली होती.
केंदीय स्तरावरून चक्रे वेगात फिरली व डोंबिवलीतील कंपन्यांची अचानक पाहणी करून प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना न करणाऱ्या ८ कंपन्या २९ जानेवारी रोजी तडकाफडकी बंद करण्यात आल्या. या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्या पुन्हा सुरू करण्याची परवानगी मागितली होती. मात्र जोपर्यंत प्रदूषण रोखण्यासाठी पुरेशी उपाययोजना केली जात नाही, तोपर्यंत त्या बंदच ठेवल्या जातील असे मंडळातफेर् सांगण्यात आल्याने प्रदूषणाची समस्या पूर्ण सुटेपर्यंत कारवाई सुरूच ठेवली जाईल, असे संकेत मिळाले होते.
एमआयडीसीतील आणखी कंपन्यांच्या सवेर्क्षणानंतर प्रदूषणाला कारण ठरल्याचा ठपका ठेवत इंजिनमेक हीटट्रान्स, केडिया प्रोसिसिंग अॅण्ड प्रिंटिंग मिल, गणेश केमिकल इंडस्ट्रिज, मेट्रोपोलिटन एक्सिकेम, ओमेगा फाइन केमिकल, अल्केमी लॅबॉरेटरी आणि नवरत्न प्रोसेसर या ७ कंपन्यांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याचा आदेश मंडळाने दिला आहे. यापैकी ५ कंपन्या रासायनिक प्रक्रियेद्वारे उत्पादन करणाऱ्या आहेत. आगामी काळात प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना न राबवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

Saturday, February 13, 2010
News appeared in Thane Vrutant of LOKSATTA dt. 13th Feb. 2010
प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईस उद्योगमंत्री अनुकूल
कल्याण/प्रतिनिधी
डोंबिवली, अंबरनाथ औद्योगिक परिसरात प्रदूषण करणाऱ्या कारखाने मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, कंपन्या बंद करून कामगारांना देशोधडीला लावू नये, प्रदूषण करणाऱ्या सर्व यंत्रणा सुस्थितीत करण्यात याव्यात, या खासदार आनंद परांजपे यांच्या मागण्या उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांनी एका बैठकीत मान्य केल्या.
डोंबिवली परिसरातील प्रदूषणाबाबत खासदार परांजपे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी खासदार परांजपे यांनी एमआयडीसीतील तुटलेल्या वाहिन्या, उघडे नाले, चेंबर्स यांचे फोटो मंत्र्यांना दाखविले.
खासदार परांजपे यांच्या सूचनांची दखल घेत मंत्री राजेंद्र दर्डा यांनी रसायन वाहून नेणाऱ्या वाहिन्या तातडीने दुरुस्त कराव्यात, उद्योगांना सीएनजी, एलपीजीद्वारे पुरवठा करावा, पेट्रोकोकचा वापर टाळावा, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आदेश दिले.
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी चिखलोली धरण परिसरात सक्सेरिया व फुक्स लिर्बेकंटे या कंपन्या आपले प्रकल्प सुरू करून अंबरनाथमधील नागरिकांचे जीवन धोक्यात आणत असल्याचे लक्षात आणून दिले.
या कंपन्यांना एमआयडीसी व एमपीसीबीने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले.
२७ गावांमधील थकीत पाणीपट्टीबाबत मंत्री दर्डा यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना एखादी नवीन योजना देऊन नव्याने थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी सहकार्य करण्याची सूचना खासदार परांजपे यांनी केली. मासिक हप्ता भरून नवीन नळ जोडणीस मंत्र्यांनी मान्यता दिली.

Subscribe to:
Posts (Atom)