Saturday, October 3, 2009

News in Maharshtra Times about problems created by STRAY DOGS

लोकपुरम की श्वानपुरम?
3 Oct 2009, 0417 hrs IST



भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने लोकपुरमचे


रहिवासी बेजार

>> म. टा. प्रतिनिधी, ठाणे

लोकपुरम सोसायटीत राहणाऱ्या एक हजार कुटुंबांना दोन श्वानप्रेमींनी अक्षरश: रडकुंडीला आणले आहे. या श्वानप्रेमींनी २० ते २२ भटक्या कुत्र्यांना पाळले असून या कुत्र्यांनी गेल्या सहा महिन्यात सात ते आठ मुलांचे लचके तोडले आहेत. या कुत्र्यांच्या दहशतीमुळे लोकांना घराबाहेर पडण्यासही भीती वाटत असून या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर या श्वानप्रेमींना अटकही झाली होती. परंतु, त्यानंतरही या श्वानप्रेमींचा उपदव संपला नसून पालिकेने इथल्या कुत्र्यांना सोसायटीच्याबाहेर स्थलांतरीत करावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

लोकपुरम ही ठाण्यातली सर्वात जुनी सोसायटी असून तिथल्या इमारतींमध्ये ११०० फ्लॅट आहेत. त्याशिवाय या सोसायटीच्या आवारात लोकपुरम पब्लिक स्कुल असून त्यात तीन हजार विद्याथीर् शिक्षण घेत आहेत. या सोसायटीत राहणाऱ्या संजीव दिघे आणि यतिन म्हात्रे हे श्वानप्रेमी सभोवतालच्या कुत्र्यांना दररोज खायला प्यायला देत असतात. त्यामुळे हे कुत्रे सोसायटीच्याच आवारात डेरा टाकून बसतात. ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर भुंकणे, त्यांच्यावर चाल करून जाणे असे प्रकार करणाऱ्या या कुत्र्यांनी प्रचंड दहशत निर्माण केल्याचे इथले रहिवासी सांगतात. रात्री बारा - एक वाजल्यानंतर चालत किंवा बाईकवरून घेरी जाणे अवघड झालेय. अनेकांनी मॉनिर्ंग वॉक आणि जॉगिंगला सोडचिठ्ठी दिली आहे. पहाटेच्या शांतसमयी, मोकळा वारा अंगावर घेत, शुद्ध हवा पीत जॉगिंग करत असतानाच कुत्रे चावल्याने काही जणांना थेट हॉस्पिटलात जावं लागले आहे. रात्रपाळीवरून परतणारे कर्मचारी, पेपर विक्रेते आणि दुधाचं वाटप करणारे विक्रेते यांनाही भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. या कुत्र्यांनी सर्वाधिक दहशत निर्माण केली आहे ती सोसायटीतल्या मुलांवर. गेल्या आठवड्यात संजीवनी झा या आठ वर्षाच्या मुलीला कुत्रा चावला. त्यामुळे इथल्या रहिवाशांमध्ये खदखदणाऱ्या संतापाचा उदेक झाला. त्यांनी थेट वर्तकनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस निरिक्षक जाधव यांनी या परिसराची पाहणी केली. इथे कुत्र्यांची खरोखरच दहशत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर या दोन श्वानप्रेमींना एक दिवस गजाआड पाठविण्यात आले होते. त्यानंतर तरी या कथित श्वानप्रेमींचे वागणे बदलेल अशी सोसायटीतल्या रहिवाशांची अपेक्षा होती. परंतु, ती साफ फोल ठरली आहे.

प्राण्यांविषयी ममत्व सोसायटीच्या सामान्य लोकांच्या मनातही आहेच. मात्र, जिथे स्वत:च्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्यानंतर संकटावर जालीम उपाय शोधायलाच लागतो. त्यामुळे या कुत्र्यांचा बदोबस्त करण्याची मागणी इथल्या रहिवासी अॅड. उमेशचंद यादव-पाटील यांनी केली आहे. बंदोबस्त करा म्हणजे सरसकट सर्व कुत्र्यांना ठार मारून टाका असे आम्हाला म्हणायचे नसून या कुत्र्यांना अन्य ठिकाणी स्थलांतरीत करणे सहज शक्य आहे. पालिकेने त्यासाठी पुढाकार घ्यावा अशीच विनवणी इथले रहिवासी करत आहेत.

No comments:

Post a Comment