Sunday, August 5, 2018

पलावा - डोंबिवली - भटक्या कुत्र्यांची दहशत आता लहान मुलांच्या जिवावर आलीये

पलावा - डोंबिवली - भटक्या कुत्र्यांची दहशत आता लहान मुलांच्या जिवावर आलीये
( NEWS18 लोकमत या वृत्तवाहिनीकडून हि माहिती मिळाली आहे. )
भटक्या कुत्र्यांची दहशत आता लहान मुलांच्या जिवावर आलीये... ३ ऑगस्ट, २०१८ च्या संध्याकाळी ७ च्या सुमारास डोंबिवलीतील लोढा परीसरात एका ८ वर्षाच्या मुलीवर अचानक ४-५ भटक्या कुत्र्यांनी हल्ल केला आणि अक्षरश: त्या मुलीचे लचके तोडलेत ... जवळपास ४-५ ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी त्या चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडले असून स्थानिक रहिवाशांनी त्या मुलीला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले आणि तिथे तिझ्यावर उपचार केले... मुलीचे नाव माही सिंग असून ती याच पलावा परीसरात राहणारी या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशी संतापले असून या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास मोठं आंदोलन करु असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिलाय...
डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून रोज अशा घटना घडत असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त पालिका प्रशासन का करत नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय... याच परीसरात काल देखील एका महिलेवर ७-८ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता यांत महिलेने प्रसंगावधान दाखवून स्वत:चा जीव वाचवला मात्र या दरम्यान महिलेचा महागडा मोबाईल मात्र फुटला...
या विषयी जास्त माहितीसाठी कृपया या सोबतची छायाचित्रे व हि ध्वनी चित्र फीत पहा .
https://www.youtube.com/watch?v=mMGIvlG5F3Q&feature=share




हे तुमच्या बाबतीत देखील घडू शकते . News18 Lokmat Special Show - भटक्या कुत्र्यांचं करायचं काय ?

Wednesday, August 1, 2018

एक विनोदी जाहिरात

एक विनोदी जाहिरात 

अहो हसणे हे हसणाऱ्याच्या तब्येतीला चांगलं असतं  

तेंव्हा १ जुलै, २०१८ च्या मराठी दैनिकातील हि एक विनोदी जाहिरात वाचा , आणि थोडसं तरी हसा !

जाहिरात नीट वाचा . 

" एक डाळ मिल मालकी / भाडे तत्वावर खरेदी करायची आहे " 

माझ्या मते खरेदी हि मालकी तत्वावर करतात , व  भाडे तत्वावर घेतात . 

भाडे तत्वावर कधीच  खरेदी करीत नाहीत . 

आहे कि नाही विनोदी जाहिरात ?  


Tuesday, July 31, 2018

उंदीर , कुत्रा या प्राण्यांच्या मूत्रापासून लेप्टोस्पायरोसिसच्या संसर्गाचा जास्त धोका असतो

'लेप्टोस्पायरोसिस' होण्याचे एक कारण
 उंदीर , कुत्रा या प्राण्यांच्या मूत्रापासून लेप्टोस्पायरोसिसच्या संसर्गाचा जास्त धोका असतो .
 NEWS18लोकमत - ता. ३० जुलै, २०१८
 कोठे गेले भटका कुत्रे प्राणी मित्र ? , कोठे गेल्या भटका कुत्रे प्राणी मैत्रिणी ?



Sunday, July 29, 2018

मुंबई मध्ये सोळा वर्षीय मुलाचा लेप्टोमुळे मृत्यू - " भटक्या कुत्र्यांच्या मूत्रामुळे देखील लेप्टो स्पायरोसिस हा एक जीवघेणा रोग होतो "

मुंबई मध्ये सोळा वर्षीय मुलाचा लेप्टोमुळे मृत्यू 

हि बातमी , रविवार , २९ जुलै, २०१८ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकात आली आहे. 

हि एक अतिशय दुर्दैवी व हृदयद्रावक घटना आहे. 

या अगोदर म्हणजे जून, २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात मुंबई मध्ये तीन मानव प्राण्यांचा लेप्टो ने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  पुराव्यासाठी  (  http://www.freepressjournal.in/health/leptospirosis-claims-two-lives-in-mumbai-heres-all-you-need-to-know-about-the-bacterial-disease/1307036  )   या संकेतस्थळावरील हि माहिती  वाचा . 

" भटक्या कुत्र्यांच्या मूत्रामुळे देखील लेप्टो स्पायरोसिस हा एक जीवघेणा रोग होतो " . हे मी मनाचं नाही सांगत . 

तुम्हाला खोटं वाटत असेल तर "  https://www.healthline.com/health/weils-disease  "  या संकेतस्थळावरील हि माहिती  वाचा . 
"Weil’s disease is a severe form of leptospirosis. This is a type of bacterial infection. It’s caused by Leptospira bacteria.
You can contract it if you come into contact with the urine, blood, or tissue of animals or rodents that are infected with the bacteria. These may include:
  • cattle
  • pigs
  • dogs
  • rats " 
मुंबई या महाराष्ट्राच्या राजधानीत अंदाजे १,५०,००० च्या वर भटके कुत्रे असण्याची दाट शक्यता आहे. 

मी भटक्या कुत्र्यांच्या भयावह वेगाने वाढणाऱ्या संख्येविरुद्ध गेली अंदाजे १० वर्षे गल्ली ते दिल्ली लढत आहे , पण दुर्दैवाने बाकी भारतीयांचा या लढाईत पाठिंबा , सहभाग नसल्याने , शासन या गहाण प्रश्नाकडे लक्ष्य देत नाही . 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 



Thursday, July 26, 2018

कायद्याच्या रक्षकांना वाहतुकीचे नियम लागू नाहीत ?


कायदा रक्षकांना नियम लागू नाहीत का ?


https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/mumbai-local-news/do-rules-apply-to-law-enforcement/articleshow/65141663.cms?utm_source=fb&utm_campaign=mtmobile&utm_medium=referral


Wednesday, July 25, 2018

ठाणे जिल्हा परिषदेचे श्वान निर्बिजीकरण केंद्र

ठाणे जिल्हा परिषदेचे श्वान निर्बिजीकरण केंद्र 

हि बातमी तर थोडीशी सकारात्मक वाटते , पण शासकीय कामांचा वेग , गती यांचा इतिहास पाहून हि  १५ वर्षीय अथवा २५ वर्षीय  योजना ठरेल अशी भीती  वाटते . 

अजून एक दुर्दैव म्हणजे जर चुकून हे खरंच अमलात आले तरीही ते ठाणे जिल्ह्यात होणार आहे ,म्हणजेच ठाणे महानगर पालिका हद्दीसाठी बहुतेक नसणार .