Sunday, March 5, 2017

Promptness of Maharashtra Pollution Control Board

Promptness of Maharashtra Pollution Control Board  

News published in " Hindustan Times" dt. 5 th March, 2017.



महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची तत्परता !

नमस्कार , 

 महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची तत्परता !    😢 😊 😢 ☺ 

" पुढारी " वृत्तपत्र , रविवार , ५ मार्च , २०१७






आता कुत्र्यांच्या शर्यती | कोठे गेले प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी ?

कोठे गेले प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी ?

आता कुत्र्यांच्या शर्यती |

संपूर्ण बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा 


Saturday, March 4, 2017

धक्कादायक माहिती STAR HEALTH INSURANCE कळवीतात कि विम्याची रक्कम ONLINE ने / क्रेडिट कार्ड ने नाही भरू शकत

नमस्कार , 

माझ्या कडे STAR HEALTH INSURANCE ची एक पॉलिसी ( Policy number P/171117/02/2016/003180 ) आहे.  याचे पुढील वर्षाचे पैसे क्रेडीट  कार्ड  ने पैसे कसे भरायचे यासाठी मी  1800 425 2255 या क्रमांकावर संपर्क साधला असता मला अशी धक्कादायक माहिती दिली कि माझ्या पॉलिसीसाठीचे पैसे  क्रेडीट  कार्ड  ने भरता  येणार नाहीत . म्हणून मी त्यांना एक इ मेल ने विचारणा केली , आणि त्याला हे धक्कादायक उत्तर मिळाले 

मला STAR HEALTH INSURANCE यांच्याकडून आलेला खालील एक धक्कादायक खुलासा पहा . 

भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी जी यांची DIGITALISATION कडे वाटचाल चालली आहे , आणि अश्या वेळी STARHEALTH INSURANCE मला काळवी ते कि मी माझ्या Accident Care Individual policy या विम्याची रक्कम  क्रेडिट कार्ड ने नाही भरू शकत . 

हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीकडे जाणारे पाऊल आहे का अधोगतीकडे जाणारे पाऊल आहे ? 


याला काय म्हणणार ? 

सत्यजित अ शाह - ठाणे 
संपर्क क्रमांक : ०९८२११५०८५८ 


---------- Forwarded message ----------
From: support <support@starhealth.in>
Date: Thu, Mar 2, 2017 at 10:50 PM
Subject: It is a shock that renewal payment cannot be paid ONLINE by CREDIT CARD Fwd: Renewal Reminder - P/171117/02/2016/003180 - 30
To: Satyajit Shah <satyajitshah64@gmail.com>

Dear Sir,

We acknowledge the receipt of your mail.

We would like to inform you that there is no online renewal option available for Accident Care Individual policy, for your below request for renewal kindly contact our star health branch office for further assistance.


Thank you, assuring best services all the time.

Regards,
Junaid
Customer Support
Star Health & Allied Insurance

From: Satyajit Shah [satyajitshah64@gmail.com]
Sent: 02 March 2017 15:23:28
To: support
Cc: Swapnil Namjoshi; swapnil_namjoshi@yahoo.com
Subject: It is a shock that renewal payment cannot be paid ONLINE by CREDIT CARD Fwd: Renewal Reminder - P/171117/02/2016/003180 - 30
Dear Sir / Madam ,
STARHEALTH INSURANCE
Sub : No facility of making premium renewal  ONLINE PAYMENT THROUGH CREDIT CARD
Ref : Policy number P/171117/02/2016/003180
Today to understand the procudure about how to make premium renewal payment through ONLINE BY CREDIT CARD , I contacted 1800 425 2255 . But to my surprise, I have been told that for this policy that facility is not there.
Which means that I have to now write one cheque , send for depositing etc etc.
It is a SHEAR SHOCKING NEWS in the ERA of HONORABLE PRIME MINISTER SHRI. NARENDRA MODI .
Kindly make immediate arrangement for ONLINE PAYMENT THROUGH CREDIT CARD.
Regards,
Satyajit A Shah - 09821150858
Thane
---------- Forwarded message ----------
From: <customerinfo@starhealth.in>
Date: Tue, Feb 28, 2017 at 10:28 AM
Subject: Renewal Reminder - P/171117/02/2016/003180 - 30
To: satyajitshah64@gmail.com







Dear Customer,
Policy P/171117/02/2016/003180 is due for renewal on 30 Mar . Please pay on or before 29 Mar to grant continuity in cover. 
Kindly ignore if paid.

Warm Regards,

Star Health Team

Tuesday, February 21, 2017

तंत्रज्ञानाची नवलाई / पहावे ते नवलंच

नमस्कार , सुंदर संध्याकाळ , 

" तंत्रज्ञानाची नवलाई /  पहावे ते नवलंच  " 

नुकतंच मी दुबई येथे एक औद्योगिक प्रदर्शनासाठी गेलो होतो . ते प्रदर्शन WORLD TRADE CENTRE येथे होते. 

तेथे खाण्याची अनेक ठिकाणं ( FOOD STALL ) होते. 

अगोदर खाण्यासाठी पैसे द्यावे लागतात . मला कळत नव्हतं कि आपलं खाणं तयार झाल्यावर आपल्याला कसं कळणार ? 

तेवढ्यात ज्या व्यक्तीने पैसे घेतले , त्याने माझ्या हातात पहिल्या छायाचित्रात दिसत आहे ती गोलाकार चकती दिली आणि बसण्यास सांगितले. 

काही वेळाने त्या चकतीच्या परिघावरील ( ज्याला आजच्या शुद्ध मराठी मध्ये PERIMETER असे म्हणतात )   छोटेसे दिवे लागले व त्यातून आवाज येऊ लागला ( दुसऱ्या छायाचित्रात दिवे लागलेले दिसत आहे ) . 

हा एक संकेत होता कि मला हवे असलेले खाण्याचे पदार्थ तयार आहेत. 

ती चकती त्यांना द्यायची आणि आपले खाण्याचे पदार्थ घ्यायचे .  

म्हणजे आपल्यासारखं  VEG SANDWICH , VEG SANDWICH , असं ओरडणं कोठेही चालू नव्हतं .  त्याचप्रमाणे मेरा तयार हुआ क्या ? वगैरे विचारणाऱ्यांची तेथे गर्दी नव्हती , त्यामुळे ते असं सरळ सोट पणे मिळालेलं खाणं मला व्यवस्थित पचले नाही. 

असो हे तंत्रज्ञान अनोखं वाटलं म्हणून येथे कळवीत  आहे. 

२१. ०२. २०१७ 



Saturday, February 18, 2017

"आफ्टर ऑल मराठी इस माय मदर टंग "

नमस्कार , रविवारची प्रसन्न सकाळ , 

"आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे"

"आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे" . कारण आपल्या मदरटंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात, तितके फॉरीन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातं. इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल.
        
- पु.ल. देशपांडे -   संदर्भ : "आमचे भाषाविषयक धोरण  "     

सध्या मराठीची गत याहूनही वाईट झाली आहे . 

दोन  मराठी व्यक्ती , मराठी मध्ये बोलताना प्रत्येक वाक्यात अंदाजे ४० ते ८० % इंग्रजी शब्द वापरतात. आकाशवाणी वरील मराठी कार्यक्रमात देखील काहीसं असच अनुभवायला मिळतं . याबाबत आकाशवाणी निवेदक / निवेदिका ( आमच्या शुद्ध मराठीत RJ ) यांना याबाबत  दूरध्वनी केला असता , " YOUNG GENERATION " ला कळण्यासाठी आम्ही असं मराठी कमी व इंग्रजी शब्द जास्त बोलतो , असं उत्तर मिळतं . आकाशवाणी वरील एका मराठी  FM वाहिनीवरील,  एका मराठी  कार्यक्रमाचं नाव होतं , BREAKFAST SHOW . 

मराठी मालिकांचे हाल तर याहूनही वाईट आहेत.  

मी आधीही कोणाला इंग्रजी संभाषण करताना , JUST NOW FINISHED MY नाश्ता , असे कधीच ऐकले नाही , पण मराठी संभाषणात मात्र आताच BREAK FAST केला , असे सर्रास ऐकू येते. 

शुद्ध मराठी बोलताना ( मातृभाषेत ) , कसली लाज वाटते , कसला कमीपणा वाटतो ?  

कोठे नेऊन  ठेवले आहे मराठी माणसांनी मराठीला ? 

प्रतिक्रिया देण्या अगोदर कृपया व्यवस्थित वाचा , आपण मराठी संभाषणात किती इंग्रजी शब्द , वाक्ये वापरता याचा हि विचार करा . 

चला , स्वतःपासूनच शुद्ध मराठी बोलायची सुरुवात करूया . 

आपणच मराठीला वाचवूया !  

सत्यजित अ शाह - ठाणे