माझ्या वाहन क्रमांक पाटीवर वाहन क्रमांकाऐवजी सत्यजित अ शाह एवढेच लिहिण्याची परवानगी मिळण्याबाबत
" ठाणे वैभव " या ठाणे येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिकाने हि बातमी छापून हा प्रश्न वाचकांसमोर नेला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार .
माननीय मुख्यमंत्री यांना मी केलेला अर्ज खाली दिला आहे.
०८ मे २०१९
प्रति ,
माननीय मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य ,
महाराष्ट्र राज्य , भारत
माननीय मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य ,
महाराष्ट्र राज्य , भारत
विषय : माझ्या वाहन क्रमांक पाटीवर वाहन क्रमांकाऐवजी सत्यजित अ शाह एवढेच लिहिण्याची परवानगी मिळण्याबाबत
संदर्भ : वाहन क्रमांक पाटीवर वाहन क्रमांकाच्या ऐवजी चित्र , विचित्र वाहन क्रमांक लावून सर्रासपणे फिरणाऱ्या गाड्यांविरुद्ध माझी गेले ५ ते ६ वर्षे अविरत पणे चाललेली गल्ली ते दिल्ली लढाई
माननीय मुख्यमंत्री साहेब ,
मी गेली अनेक वर्षे गल्ली ते दिल्ल्ली , सर्व शासकीय पातळीवर वाहन क्रमांक पाटीवर वाहन क्रमांकाच्या ऐवजी चित्र , विचित्र वाहन क्रमांक लावून सर्रासपणे फिरणाऱ्या गाड्यांविरुद्ध अविरत पणे लढाई लढत आहे . पण माननीय महोदय दिवसेंदिवस वाहन क्रमांक पाटीवर वाहन क्रमांकाच्या ऐवजी दादा , मामा , नाना , बाबा , राडा , राज , पवार , मराठा , छत्रपती , वगैरे वगैरे लावून फिरणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे . उदाहरणादाखल मी या ई मेल सोबत आज , दिनांक ८ मे, २०१९ रोजी , कसारा - शहापूर मार्गावर वाहन क्रमांक पाटीवर
" MH04 - HB - नाना " असे लिहिलेली दुचाकी पाहिली . पोलिसांना प्रत्येक गोष्टीचा पुरावा लागतो म्हणून यासोबत त्या दुचाकीचे छायाचित्र देखील जोडलेले आहे. त्याच्या थोडं पुढे गेल्यावर भिवंडीच्या अलीकडे एक चार चाकी वाहनावर पुढील व मागील वाहन क्रमांक पाटीवर " XXXX-XX-दादा " असे लिहिलेले पहिले व त्याचप्रमाणे त्या चार चाकीला काळ्या कुट्ट अश्या काचा होत्या.
ज्या अर्थी या सगळ्यांविरुद्ध गल्ली ते दिल्ल्ली वेग वेगळ्या शासकीय पातळीवर लढून देखील हे काही कमी होत नाही , उलट हे असे वाहन क्रमांक लिहिणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे याचा एक अर्थ असा देखील होतो कि हे सगळं बहुतेक नियमबाह्य नसावं . या पुढे तर वाहन क्रमांक पाटीवर वाहन क्रमांकाच्या ऐवजी , वाहन मालक स्वतःचे एका मोठ्ठ्या आसनावर बसलेले असे फक्त छायाचित्र देखील लावून फिरताना आढळून येतील.
माननीय महोदय , आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आहात , त्यामुळे मी आपल्याकडे या ई मेल द्वारे नम्रपणे एक विनंती अर्ज करतो कि मला देखील माझ्या चार चाकी वाहनाच्या पुढील व मागील वाहन क्रमांक पाटीवर वाहन क्रमांकाच्या ऐवजी खालीलप्रमाणे लिहिण्याची लेखी परवानगी द्यावी .
महाराष्ट्र - ठाणे - सत्यजित अ शाह
माननीय मुख्यमंत्री साहेब , आपण माझ्या या विनंती अर्जाचा आवर्जून विचार करून लेखी परवानगी द्यावी हि आपणाला नम्र विनंती .
चूक भूल माफ असावी .
आपला कृपाभिलाषी ,
आपला कृपाभिलाषी ,
सत्यजित अ शाह - ठाणे
भ्रमणध्वनी क्रमांक : ०९८२११५०८५८
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet
प्रत ( C.C. ) : १. ) माननीय राज्यपाल - महाराष्ट्र राज्य
२. ) माननीय श्री. संजय जी केळकर साहेब - आमदार - ठाणे शहर
No comments:
Post a Comment