Tuesday, April 30, 2019

अशी कशी हि प्रसार माध्यमं ? ( वृत्तपत्रे , वृत्तवाहिन्या )

अशी कशी हि प्रसार माध्यमं ? ( वृत्तपत्रे , वृत्तवाहिन्या ) 

आज , मंगळवार , ३० एप्रिल, २०१९ च्या प्रत्येक वृत्तपत्रामध्ये एक बातमी ठळक पणे दिसून येतेय . ती म्हणजे " एक राजकीय नेते मतदानासाठी १.५ ते २.० तास रांगेत राहिले " .  खरं तर हि एक सकारात्मक गोष्ट आहे , पण त्याचं एवढं कौतुक होतंय याचं फार आश्चर्य वाटतय . नियमानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानासाठी रांगेत उभं राहणं गरजेचं आहे. 

आत्ता पर्यंत नेते, राजकारणी , खेळाडू , चित्रपटश्रुष्टीतील कलावंत वगैरे ना अगदी देवाच्या म्हणजेच परमेश्वराच्या जागी ठेवलं होतं त्यामुळे हे असं कधी होत नसेल . 

आपण कधी खालीलप्रमाणे बातम्या ( BREAKING NEWS )  वाचल्या / पाहिल्या आहेत का ? 

- XXXXXX नेते दुचाकी चालविताना विना शिरस्त्राण  आढळले व त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली . 
- XXXXXX नेते चार चाकी चालविताना आसन  पट्टा न लावताना  आढळले व त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली . 
- XXXXXX नेते चार चाकी मध्ये पुढील  आसनावर  आसन  पट्टा न लावताना बसलेले   आढळले व त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली . 
- XXXXXX या नेत्याच्या वाहनावरील वाहन क्रमांक नियमाप्रमाणे नव्हता म्हणून  त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली . 
- XXXXX या नेत्याच्या वाहना ला काळ्या कुट्ट काचा होत्या म्हणून  त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली .
- XXXXX या नेत्याचे वाहन चुकीच्या जागी उभे केले म्हणून  त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली .  
- XXXXXX या नेत्याच्या वाहनाने वाहतूक नियमन दिव्यांचे ( TRAFFIC SIGNAL LIGHTS ) चे पालन केले नाही म्हणून  त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली .  
- XXXXXX या नेत्याच्या वाहनाने वेग मर्यादेचे पालन केले नाही म्हणून  त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली .  
- XXXXXX या नेत्याच्या वाहनाने पथकर भरला नाही म्हणून  त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली .  
- XXXXXXX या राजकीय पक्ष्याने काढलेल्या  दुचाकी फेरीतील दुचाकी स्वारांनी शिरस्त्राण नव्हते घातले म्हणून  त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली .

या व इतर अनेक नियम  नेते, राजकारणी , खेळाडू , चित्रपटश्रुष्टीतील कलावंत वगैरे   नेते, राजकारणी , खेळाडू , चित्रपटश्रुष्टीतील कलावंत वगैरे पाळत नाहीत , पण त्यांच्यावर कारवाई होताना आढळून येत नाही व प्रसार माध्यमे देखील अश्या बातम्या देत नाहीत . 

हे योग्य आहे का ? 

अशी कशी हि प्रसार माध्यमं ? ( वृत्तपत्रे , वृत्तवाहिन्या )   

Sunday, April 14, 2019

रहिवासी संकुलाच्या आवारात भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या रहिवाश्यांना दररोज रुपये २,५०० एवढा दंड

रहिवासी संकुलाच्या आवारात भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या रहिवाश्यांना दररोज रुपये २,५०० एवढा दंड  

कांदिवली , मुंबई , महाराष्ट्र राज्य , भारत येथील एका रहिवासी संकुलातील व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी रहिवासी संकुलाच्या आवारात भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या रहिवाश्यांना दररोज रुपये २,५०० एवढा दंड आकारण्याचे ठरवले व त्याप्रमाणे दंड आकारणी चालू देखील केली. 

हि बातमी वाचण्यासाठी खालील साखळीवर ( LINK ) वर जा 

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/kandivali-society-levies-fine-of-rs-2500-per-day-for-feeding-stray-dogs/articleshow/68870608.cms?fbclid=IwAR3DVYGz2r3udBXVd86i5t6qurqzPzJTkXGyou8S10Zt9gdTYLPhDc6OoL0

भविष्यात काय होणार याची हि एक नांदीच आहे. 

" मानव मरो , पण भटके कुत्रे जगो " हे थांबविले पाहिजे .

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Saturday, April 13, 2019

श्वानाला ( कुत्र्याला ) गाडीवर धावून आल्यामुळे हाड म्हणाल्यामुळे ( हाकलले म्हणून ) दोघांना जबर मारहाण


श्वानाला ( कुत्र्याला ) गाडीवर धावून आल्यामुळे  हाड म्हणाल्यामुळे ( हाकलले म्हणून ) दोघांना जबर मारहाण

१४.०४.२०१६ च्या " लोकसता " या वर्तमान पत्रातील एक बातमी येथे देत आहे . 

हि भविष्य काळासाठी हि फार मोठी धोक्याची घंटा आहे.

" भारत " हा या आधुनिक जगातील असा एकुलता एक देश आहे , जेथे " भटका कुत्रा " नावाच्या चार पायाच्या प्राण्याला , " मानव प्राणी " नावाच्या दोन पायाच्या प्राण्यापेक्षाही फारच जास्त किंमत आहे.

हे सगळ मी माझ्या "भटक्या कुत्र्यांना " राष्ट्रीय प्राणी घोषित करा या उपहासात्मक लेखात लिहिले होते. तो लेख ७.४.२०१५ च्या " नवाकाळ " या वृत्तपत्रात छापून आला होता.

हे असेच चालू राहिले तर काही वर्षां नंतर " भारत " नावाच्या देशात अशी मारहाण करणाऱ्यांना " कुत्रा भूषण " वगैरे किताब दिला जाईल.

" मानव प्राणी मरो , पण भटके कुत्रे जगो " - एक आधुनिक म्हण 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


कबुतरांना उघड्यावर खाऊ घालणाऱ्यांना दंड - याच धर्तीवर असाच नियम , भटक्या कुत्र्यांना उघड्यवर खाद्य दिल्यास लागू व्हायला नको का ?

कबुतरांना उघड्यावर खाऊ घालणाऱ्यांना दंड - याच धर्तीवर असाच नियम , भटक्या कुत्र्यांना उघड्यवर खाद्य दिल्यास लागू व्हायला नको का ?

१. ) कबुतरांना खाऊ घालताय, सावधान ! आता मुंबई महानगरपालिका   आता दंड वसूल करणार
 २. ) " कबुतरांना खाद्य दिल्यास ५०० रुपये दंड आकारणार " - पनवेल  महानगर पालिका 

३. ) कबुतरांना उघड्यावर खाद्य घालणाऱ्यांना ५०० रुपये दंड - वसई - विरार महानगर पालिका 

याच धर्तीवर असाच  नियम , भटक्या कुत्र्यांना उघड्यवर खाद्य दिल्यास लागू व्हायला नको का ?
" भारत " या देशात दररोज अंदाजे १,५०,००० ते १,६०,००० निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होत असतो .
  

मानव प्राणी मरो , पण भटके कुत्रे जगो ! 



" देवभक्त " वाहन मालक

" देवभक्त " वाहन मालक :   आज रामनवमी  . आजच्या दिवशी मला छायाचित्रातील एका " देवभक्त " वाहन मालकाचे  वाहन पाहण्याचा  योग्य आला . 

हे  " देवभक्त " वाहन मालक वाहन  मालक एवढे देवभक्त असतात कि त्यांची हि देवभक्ती त्यांच्या वाहन क्रमांक पाटीतून ओथंबून वाहत असते.  कशी काय ? अहो  उदाहरणार्थ या काही वाहन क्रमांक पाट्या पहा .  MH-XX-XX-साई ,  MH-XX-XX-राम .  काय पटली ना यांची देवभक्ती ?  काय म्हणता ? या अश्या वाहन क्रमांक पाट्यांसमोर   हे वाहन मालक रोज सकाळी  उदबत्ती देखील ओवाळतात का ?  हे पहा असा खोचक प्रश्न विचारून त्यांच्या देवभक्तीची चेष्टा करू नकात अशी आपणाला नम्र विनंती .   

गम्मत म्हणजे खाकी पोलीस , वाहतूक पोलीस हे सुद्धा अश्या वाहन पाटीवर देवाचे नाव लिहिलेले असते , त्यामुळे ( देवभक्ती मुळे ) त्या वाहन मालकां विरुद्ध , MVA या कायद्यानुसार कारवाई करण्यास देखील धजावत नाहीत . 

असो , तरीही  बोला " मेरा भारत महान " . कायद्यानुसार चालणारे मात्र ठरती लहान .  


Friday, April 5, 2019

भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांचा त्रास

" भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांचा त्रास " 

ठाणे शहरात या प्रकारे अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या दहशत पसरवीत आहेत. 

भटक्या कुत्र्यांची संख्या अमर्याद अश्या वेगाने वाढतेय . 

श्वानदंशाच्या घटनांची संख्या भायवाय अश्या वेगाने वाढतेय . 

मानव प्राणी मरो , पण भटके कुत्रे जगो अशी काहीशी परिस्थिती झालीय . 


Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Monday, April 1, 2019

क्रिया प्रतिक्रिया

नमस्कार , 
" क्रिया प्रतिक्रिया "
अनेक भारतीय स्वतः काहीही " क्रिया " न करता , फक्त आणि फक्त " प्रतिक्रिया " देण्यात ( "उचलली जीभ लावली टाळ्याला" यात ) धन्यता मनात असतात.
अश्या " प्रतिक्रिया " वादी भारतीयांना हि माझी " क्रिया प्रतिक्रिया " कविता सादर .
ही कविता कोणीही चोरण्याचा प्रयत्न करू नये . माझ्या " आजची सत्यगितं " या काव्य संग्रहाहात ही कविता छापली आहे.
" क्रिया प्रतिक्रिया "
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे
घरात बसून प्रतिक्रिया देणं निरर्थक आहे
फक्त स्वतः साठीच जगणं मात्र व्यर्थ आहे
अन्यायाविरुद्ध गप्प बसणं कसं काय तुम्हाला शक्य आहे ?
मी , माझं कुटुंब एवढंच तुमच्या आयुष्याचं सूत्र आहे ?
सभोवतालच्या प्रश्नांकडे कसं काय तुमचं दुर्लक्ष्य आहे ?
अशाने शासन कर्त्यांचं मात्र फावत आहे
कारण जनतेच्या सहनशीलतेची त्यांना कल्पना आहे
जागरूक नागरिक बनणं सगळ्यांचं कर्तव्य आहे
ठराविक नागरिकांनीच लढून सगळे प्रश्न सुटणे कठीण आहे
ज्याला स्वतःच्या हक्काची जाणं आहे
तोच खरा भारतीय नागरिक सुजाण आहे
गप्प बसून सगळं सहन करणं हे काय जिणं आहे ?
विसरू नकात समाजाचं तुम्ही पण काही देणं आहे
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे
घरात बसून प्रतिक्रिया देणं निरर्थक आहे
कवी : सत्यगीत 
( सत्यजित अ शाह )