Friday, January 25, 2019

In conversation with Satyajit Shah - The MAD MAN by Vrajesh Hirjee on 92.7 Big Fm under DHOON BADAL KE DEKHO in MUMBAI MASKA MAAR KE

In conversation with Satyajit Shah - The MAD MAN by Vrajesh Hirjee on 92.7 Big Fm
under DHOON BADAL KE DEKHO in MUMBAI MASKA MAAR KE

To watch Full Interview , click on this link

https://www.facebook.com/92.7bigfm/videos/243689153201600/

Dhun Badal Ke Dekho 92.7 Big Fm

dhun badal ke dekho , my interview was broadcasted on Friday, 25th Jan. 2019 from 8 to 9 am on 92.7 Big Fm . Thank you 92.7 Big Fm , Vrajesh Hirjee for taking my this fight to listeners of 92.7 Big Fm .

Thursday, January 24, 2019

धून बदलके देखो 92.7 Big FM


धून बदलके देखो "  - 92.7 Big FM 

92.7 Big FM या मुंबईच्या आकाशवाणी ( मी तरी RADIO ला मराठीत आकाशवाणी म्हणतो   ) वाहिनीवर  श्री.  व्रजेश हिरजी  ( हिंदी चित्रपटगोलमाल रिटर्न्स " मधील इतर अनेक हिंदी चित्रपटांमधील  एक कलाकार  ) " मुंबई मस्का मारके " ( सोमवार ते शुक्रवार सकाळी ते १० या वेळेत )  या कार्यक्रमात   " धून बदलके देखो " या शीर्षकाखाली  काही व्यक्तींची ( ज्यांनी आयुष्यात धून बदलली आहेमुलाखत घेतात

आज , गुरुवार , २४ जानेवारी , २०१९   रोजी त्यांनी माझी मुलाखत " धून बदलके देखो " या कार्यक्रमात घेतली कारण मी मार्च , २०१३ पासून खाकी , वाहतूक पोलीस यांनी दुचाकीवर शिरस्त्राण घालावे यासाठी लढतोय त्या लढाईत महाराष्ट्रातील काही शहरात ( निदान मुंबई , ठाणे , पुणे, नाशिक , नागपूर या शहरात ) काही प्रमाणात यश  आलेले आढळून येत आहे

हि मुलाखत बहुतेक उद्या , शुक्रवार , २५ जानेवारी, २०१९ अथवा सोमवार , २८ जानेवारी, २०१९ रोजी प्रसारित ( आजच्या शुद्ध प्रचलित मराठीत BROADCAST ) होणार आहे  . 

मुंबई करांनो जमलं तर ऐकावं हि विनंती

जमलं तर प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या प्रश्नविरुद्ध लढावे . आजच्या आधुनिक युगात तुम्ही तुमच्या संगणकाद्वारे  , भ्रमणयंत्राद्वारे  देखील अश्या लढाया लढू शकता . लक्ष्यात ठेवा ठाणे शहराचे लाडके आमदार श्री. संजय केळकर साहेब म्हणतात कि व्यस्त ( आजच्या शुद्ध प्रचलित मराठीत BUSY  ) माणूसच  वेळात वेळ काढू शकतो .  ( मी ती मुलाखत संपल्यावर माझ्या अंधेरी तील व्यावसायिक भेटी उरकून घेतल्या

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone ! 







Wednesday, January 16, 2019

बिबट्या दर्शन सहल - नवाकाळ

नमस्कार ,
" बिबट्या दर्शन सहल " या शीर्षकाचा मी स्वतः लिहिलेला एक लेख १५ जानेवारी, २०१९ च्या " नवाकाळ " या एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकात छापून आलेला लेख यासोबत देत आहे.
हा लेख छापल्याबद्दल सौ. जयश्री ताई खाडिलकर - पांडे यांचे धन्यवाद .
बिबट्या दर्शन सहल
वन्य प्राणी दर्शनासाठी आपल्या डोळ्यासमोर ताडोबा,पेंच , कान्हा , बांधवगड हे असे अभयारण्य / व्याघ्र प्रकल्प डोळ्यासमोर येतात, या अभयारण्यात बिबट्याचे दर्शन हे तसे फारच दुर्मिळ असते . मी आजपर्यंत अंदाजे ५० वेळा व्याघ्र प्रकल्पात भ्रमण ( SAFARI ) केलं आहे , पण फक्त एकदाच पेंच अभयारण्यात बिबटीण व तिच्या ३ बछड्यांचे दर्शन झाले होते. जेव्हा राजस्थान राज्याची राजधानी असलेल्या जयपूर शहरात " झालाना बिबट्या प्रकल्प / झालाना बिबट्या आरक्षित / संरक्षित क्षेत्र " ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत " Jhalana Leopard Reserve " ) आहे असे कळले व तेथे उघड्या जिप्सी मधून भ्रमण करण्याची सोय आहे हे कळल्यावर तेथे कधी पोहचू असे झाले होते. तो योग मनीष खरे या माझ्या अरण्य भ्रमण सहली घेऊन जाणाऱ्या मित्रामुळे आला .
झालाना बिबट्या प्रकल्प हा जयपूर शहराच्या पूर्वेला आहे . जयपूर रेल्वे स्थानक , जयपूर विमान तळापासून हा बिबट्या प्रकल्प अंदाजे १० ते १५ किलोमीटर च्या अंतरावर आहे . या प्रकल्पाचे अंदाजे क्षेत्रफळ २४ चौरस किलोमीटर एवढे आहे. या प्रकल्पात डोंगराळ भाग आहे , खडकाळ भाग आहे , गर्द झाडी आहेत , गवताळ असे सपाट क्षेत्र देखील आहे . आजच्या घडीला या अभयारण्यात अंदाजे २० ते २२ बिबटे असण्याची शक्यता आहे . या बिबट्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्ही बिबट्याला त्याच्या साम्राज्यात ( नैसर्गिक अवस्थेत ) वावरताना पाहतो . या प्रकल्पाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बहुदा हा जगातील बिबट्यांचे संवर्धन करणारा जगातील हा पहिला वाहिला प्रकल्प असू शकतो .
एवढ्या छोट्याश्या क्षेत्रफळात एवढ्या संख्येने बिबटे असल्याने बिबट्यांचे दर्शन होण्याची शक्यता खूपच जास्त असते . आम्हाला एखादे दुसरे भ्रमण / फेरी सोडता , प्रत्येक भ्रमणात / फेरीत ( सफारीत ) बिबट्याचे दर्शन झाले. एका भ्रमणाच्या वेळी तर बिबटीण तिच्या तोंडात हरिणाच्या पाडसाची शिकार तिच्या बछड्यांना घेऊन जाताना दिसली . ( ते छायाचित्र येथे देत आहे . ) . एका भ्रमणात तर बिबटीण संध्याकाळी अरण्यात फिरताना दिसली , व तीच भ्रमांची वेळ संपता , संपता एका झाडाच्या मोठ्या फांदीवर ऐटीत बसलेली दिसली . आम्ही गेलो होतो तेंव्हा ( डिसेंबर , २०१८ ) नुकतेच एका बिबटीणीला बछडे झाले होते , पण तिने ते बछडे अजूनही तिच्या उंच डोंगरावरील गुहेतून बाहेर नव्हते आणले. पण तीचे आम्हाला खूप दुरून दर्शन ( दुर्बिणीतून ) झाले होते.
बिबट्या हा तसा चपळ व लाजऱ्या स्वभावाचा प्राणी आहे . तो वाघासारखा ऐटीत व सावकाश नाही चालत .
बिबट्या व्यतिरिक्त तेथे पट्टेदार तरस ( STRIPED HYENA ) , वाळवंट कोल्हा ( DESERT FOX ) , कोल्हा ( Golden Jackal ) , ठिपके असलेलं हरीण ( CHITAL / SPOTTED DEER ) , नीलगाय , कस्तुरी मांजर ( ASIAN / INDIAN PALM CIVETS ) , अनेक प्रकारच्या खारुताई , वानर ( LANGUR ) , व इतर अनेक प्राणी देखील आहेत . त्याचप्रमाणे नवरंग ( INDIAN PITTA ) , पोपट , मोर , लांडोर , घुबड ( OWL ) , ठिपकेवाला पिंगळा ( SPOTTED OWLET ) , लांब शेपटीचा खाटीक / गांधारी ( LONG TILED SHIRKE ) , माळ मुनिया / पांढऱ्या कंठाची मनोली ( Indian Silverbill ) , गांधारी, छोटा खाटीक, उदीपाठी खाटीक ( Bay-backed Shrike ) , शिक्रा , कापशी घार ( BLACK SHOULDERED KITE ) , पावशा किंवा पावश्या (इंग्रजी: Brainfever Bird or Common Hawk-Cuckoo) , " टकाचोर " ( RUFOUS TREEPIE ) , युरेशियन चिमणमार ससाणा ( Eurasian Sparrowhawk ) , जंगली सातभाई ( JUNGLE BABBLER ) , लांब शेपटीचा सातभाई ( LONG TAILED BABBLER ) , कोतवाल ( DRONGO ) , दयाळ ( ORIENTAL MAGPIE ROBIN ) , पांढऱ्या भुवईची नाचणं { WHITE-BROWED FANTAIL ( FLYCATHCER ) } , सुतार ( WOODPECKER ) व इतर अनेक पक्षी देखील आहेत.
मग , कधी निघताय बिबट्या दर्शनासाठी ?
सत्यजित अ शाह - ठाणे - ९८२११५०८५८





Wednesday, January 2, 2019

प्रकाशभाऊ आमटे - AN EXTRA ORDINARY INDIAN

प्रकाशभाऊ आमटे जी या EXTRA ORDINARY INDIAN ला मानाचा मुजरा