Saturday, June 24, 2017

" वाघ " आणि " भटका कुत्रा " या दोन प्राण्यांच्या बाबत असा दुजाभाव का ?

दोन प्राण्यांच्या बाबत असा दुजाभाव का ? 

" वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा बळी " या मथळ्याची एक बातमी शुक्रवार , २३ जून, २०१७ च्या " लोकसत्ता " या दैनिकात छापून आली होती . 

यात असं देखील लिहिलं आहे कि " वाघाला पकडा अथवा मारा आणि नागरिकांचे संरक्षण  करा " अशी मागणी विधिमंडळ उपनेते आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांनी व नागरिकांनी केली आहे . 

हा असा दोन प्राण्यांमध्ये भेदभाव का ? 

काय म्हणालात तुम्हाला अजूनही कळालं नाही ? 

अहो भारत या देशात दररोज अंदाजे १,४१,९६० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो , काही भारतीय यात जीव गमावून बसतात ,   पण या " भटक्या कुत्रा " नावाच्या  प्राण्याची ,  भरमसाठ वेगाने ज्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे , अश्या या " भटक्या कुत्रा " नावाच्या प्राण्याच्या दंशापासून  स्वसंरक्षण करण्यासाठी दगड मारला तरीही , कोठून तरी प्राणी मित्र उगवतो , पोलिसांना दूरध्वनी करतो , आणि त्वरित पोलीस येतात आणि त्या दगड मारणाऱ्या मानव प्राण्याला अति महाभयंकर गुन्हा केल्याप्रमाणे पोलीस स्थानकात घेऊन जातात . 

का असा दुजाभाव " वाघ " आणि " भटका कुत्रा " या अश्या दोन प्राण्यांच्या बाबत ?


No comments:

Post a Comment