दोन प्राण्यांच्या बाबत असा दुजाभाव का ?
" वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा बळी " या मथळ्याची एक बातमी शुक्रवार , २३ जून, २०१७ च्या " लोकसत्ता " या दैनिकात छापून आली होती .
यात असं देखील लिहिलं आहे कि " वाघाला पकडा अथवा मारा आणि नागरिकांचे संरक्षण करा " अशी मागणी विधिमंडळ उपनेते आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांनी व नागरिकांनी केली आहे .
हा असा दोन प्राण्यांमध्ये भेदभाव का ?
काय म्हणालात तुम्हाला अजूनही कळालं नाही ?
अहो भारत या देशात दररोज अंदाजे १,४१,९६० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो , काही भारतीय यात जीव गमावून बसतात , पण या " भटक्या कुत्रा " नावाच्या प्राण्याची , भरमसाठ वेगाने ज्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे , अश्या या " भटक्या कुत्रा " नावाच्या प्राण्याच्या दंशापासून स्वसंरक्षण करण्यासाठी दगड मारला तरीही , कोठून तरी प्राणी मित्र उगवतो , पोलिसांना दूरध्वनी करतो , आणि त्वरित पोलीस येतात आणि त्या दगड मारणाऱ्या मानव प्राण्याला अति महाभयंकर गुन्हा केल्याप्रमाणे पोलीस स्थानकात घेऊन जातात .
का असा दुजाभाव " वाघ " आणि " भटका कुत्रा " या अश्या दोन प्राण्यांच्या बाबत ?