Wednesday, March 30, 2016

भटक्या कुत्र्यांचा उच्छाद ! STRAY DOG MENACE IN THANE

नमस्कार, 
भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बध वाढीविरुद्ध व त्यामुळे " मानव प्राण्याला " होणाऱ्या त्रासाविरुद्ध ची लढाई चालूच आहे.
३०.०३.२०१६ च्या " लोकसत्ता " या वृत्तपत्राच्या ठाणे वृत्तांत मध्ये वाचकांचे पत्र या सदरात हे छोटेसे चापून आले आहे.
आशा आहे कि वाचकांपर्यंत हे पोहोचेल. त्यातील काही वाचक सोंग घेतलेल्या झोपेतून जागे होतील आणि त्यांच्या परीने या प्रश्नावर आवाज उठवतील.
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone


Monday, March 21, 2016

आमदार श्री. संजय केळकर साहेब भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अधिवेशनात मांडणार

गेली ४ / ५ वर्षे मी भटक्या कुत्र्यांच्या या अनिर्बंध वेगाने वाढणाऱ्या संख्ये विरुद्ध गल्ली ते दिल्ली लढत आहे.
माहितीच्या अधिकाराखाली बरीच माहिती मिळवली. सह्यांचे निवेदन गोळा केले व आमदार श्री. संजय केळकर यांना दिले.
काही महिन्यांपूर्वी त्यांना या जटील प्रश्नाबाबत एक निवेदन दिले. त्या वेळची दोन छायाचित्रे येथे देत आहे.
नागपूर येथील डिसेंबर २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात आमदार श्री. संजय केळकर साहेब हा प्रश्न मांडणार होते. त्यांना हा प्रश्न मांडण्याची संधी त्या अधिवेशनात मिळाली नाही .
सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार श्री. संजय केळकर साहेब हा जटील प्रश्न मांडणार आहेत.
त्यांना हा प्रश्न या अधिवेशनात मांडण्याची संधी मिळो हि ईश्वर चरणी प्रार्थना .




ठाणे व मुंबई येथील भटक्या कुत्र्यांच्या त्रास - STRAY DOG MENACE IN THANE & MUMBAI

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,
ठाणे व मुंबई येथील भटक्या कुत्र्यांच्या अमर्याद वाढणाऱ्या संख्येमुळे मानव प्रणयाची काय वाट लागत आहे या बद्दलच्या दोन बातम्या येथे देत आहे.
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !



चार वर्षात ४५,००० नागपूरकरांना भटक्या कुत्र्यांचा चावा - 45,000 STRAY DOG BITES IN NAGPUR IN 4 YEARS

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,
चार वर्षात ४५,००० नागपूरकरांना भटक्या कुत्र्यांचा चावा
काही महिन्यांपूर्वी " महाराष्ट्र टाईम्स " च्या नागपूर आवृत्तीमध्ये आलेली एक धक्कादायक बातमी येथे नागपूरकरां च्या माहितीसाठी देत आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक शहर , जिल्हा , तालुका , गाव अशा प्रत्येक पातळीवर थोड्या फार फरकाने हेच चित्र आहे.
फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर हेच चित्र आहे,
माझ्या अंदाजाने भारत्तात जेवढी भटके कुत्रे असतील तेवढे जगातील कोणत्याही देशात नसतील. चला त्याबाबतीत तरी भारत जगाच्या पुढे आहे.
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Saturday, March 19, 2016

" आदरणीय , वंदनीय , माननीय " कवितेचे आगळे वेगळे कौतुक

नमस्कार ,
" आदरणीय , वंदनीय , माननीय "
माझ्या कवितेचे ( " आजची सत्यगीतं " या माझ्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहातील ) आगळे वेगळे पण आपुलकीने , प्रेमाने , वडिलकीच्या नात्याने शरद मेहता काकांनी केलेले कौतुक ( APPRECIATION ) मी आयुष्यात कधीच विसरणार नाही .
हि २ वर्षांपूर्वीची घटना आहे.
हे शरद मेहता काका फक्त ७८ वर्षांचे आहेत . पेशाने शिक्षक होते. " आदर्श शिक्षक " हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला होता.
" RUNWAL ESTATE C H S " , R MALL च्या मागे असलेल्या एका मोठ्या रहिवासी संकुलाच्या प्रवेशद्वारात असलेल्या फळ्यावर अप्रतिम , सुवाच्च हस्ताक्षरात रोज सुविचार लिहित असत.
नुकतेच मुलाला हैदराबाद ला स्थलांतरित व्हावे लागले म्हणून ते ठाणे येथून हैदराबाद ला गेले.



Thursday, March 17, 2016

श्वान दंश झालेली व्यक्ती / VICTIM OF STRAY DOG BITE

श्वान दंश झाल्यावर त्या व्यक्तीचे काय होतात हे या छायाचित्रामध्ये व्यवस्थित कळून येते .
विचार करा ज्यांना श्वान दंश झाला आहे त्यांचे किती व कशे हाल होत असतील.
आपल्याला हे माहित नसेल कि श्वान दंशाच्या जेवढ्या घटना होतात त्यातील ८० % घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात.

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


उल्हासनगर या शहरात दोन वर्षात १२ हजार नागरिकांना श्वानदंश ./ In 2 YEARS Twelve Thousand Cases of STRAY DOG BITES in ULHASNAGAR

नमस्कार ,

सुंदर संध्याकाळ ,

उल्हासनगर या शहरात दोन वर्षात १२ हजार नागरिकांना श्वानदंश .

मी हे काही मनाचे सांगत नाही . माझ्यावर विश्वास नसेल तर १७.०३.२०१६ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या वृत्त पत्रातील हि बातमी वाचा
झोपेचे सोंग घेतलेल्या भारतीय नागरिकांसमोर मी  हि सत्य परिस्थिती  आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

गम्मत आहे कि अनेक व्यक्ती त्यांना , त्यांच्या मुला बाळांना , आई , वडिलांना , नातेवाइकाना श्वानदंश होण्याची वाट पहात आहेत.



Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Wednesday, March 16, 2016

पिसाळलेल्या कुत्र्याचा २० जणांना चावा - STRAY DOG MENACE

नमस्कार ,

काय तुम्हाला , तुमच्या मुलांना , तुमच्या आई , वडिलांना अजूनही श्वान दंश झाला नाही ?

काळजी करू नकात , तुम्हालाही केंव्हाही , कोठेही श्वान दंश होऊ शकतो .

या सोबत १६.३.२०१६ च्या " नवा काळ " , " महाराष्ट्र टाईम्स " व " ठाणे वैभव " या वृत्तपत्रातील बातम्या वाचा.

आता तुमचीही पाळी येऊ शकते.


सांभाळा .



Thursday, March 10, 2016

IN 20 years , DOG BITES KILLED MORE THAN 2 TERROR STRIKES

नमस्कार ,
१०.०३.२०१६ च्या ' TIMES OF INDIA " व " महाराष्ट्र टाईम्स " मध्ये आलेल्या बातम्या देत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हा चांगला निर्णय घेतला आहे.