Monday, January 4, 2016

मुख्यमंत्री साहेब , भटक्या कुत्र्यांपासून आम्हाला वाचवा .- STRAY DOG MENACE in THANE , MAHARASHTRA , INDIA


गेली अनेक वर्षे माझ्या सारखा एक अति सामान्य व हतबल भारतीय नागरिक , या भटक्या कुत्र्यांच्या मानव प्राण्याला होणाऱ्या त्रासाबद्दल व भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध वाढणाऱ्या संख्ये विरुद्ध अथक पणे लढून देखील ना श्वान दंशाच्या घटना कमी होत आहेत, ना भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होत आहे.
यावर एकच इलाज म्हणजे उपोषण .
त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नुकतेच एक पत्र पाठविले आहे. ते जसे च्या तसे " महाराष्ट्र टाईम्स " या वर्तमान पत्राच्या ५.१.२०१६ च्या " ठाणे " पुरवणीत छापून आले आहे. त्याबद्दल मी " महाराष्ट्र टाईम्स " चे मनापासून आभार मानतो. एकच छोटीसी चूक आहे. २०२१ साली ठाणे या शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या सत्तावीस लाख इतकी होणार आहे ती चुकून दोन लाख सत्तर हजार अशी वर्तमान पत्रात छापून आली आहे.
मला १००० % खात्री आहे हि आपल्या शहरात , गावात , गल्लीत , बोळात अगदी आपण राहत असलेल्या रहिवासी संकुलात देखील भटक्या कुत्र्यांचा त्रास होत असणारच. पण आपण नुसती प्रतिक्रिया देत बसलात तर असे गंभीर प्रश्न मार्गी लागणार नाहीत. कृपया " क्रिया " करा . " क्रिया " करण्यासाठी मी आनंदाने मदत / मार्गदर्शन करू शकतो.
लक्ष्यात ठेवा कि आपण अनेक कर भरतो त्यामुळे आपणाला " मानव प्राण्याला " श्वान दंश विरहीत जगण्याचा , रात्री भुंकणे ना ऐकता शांत झोपण्याचा अधिकार आहे.
" भारत " हा असा एकुलता एक देश आहे जेथे " भटक्या कुत्रा " या प्राण्याला , " मानव प्राण्यापेक्षा " जास्त किंमत दिली जाते.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet

सत्यजित अ शाह - ठाणे - ०९८२११५०८५८
एक अतिसामान्य पण जागरूक नागरिक
e-mail : satyajitshah64@gmail.com


No comments:

Post a Comment