Tuesday, January 26, 2016

महाराष्ट्र राज्यातील अजून एका शहरात भटक्या कुत्र्यांचा लहान मुलांना चावा - STRAY DOG BITE case in AMBERNATH - 5 children

नमस्कार ,

महाराष्ट्र राज्यातील अजून एका शहरात भटक्या कुत्र्यांचा लहान मुलांना चावा

अजून किती लहान मुलांना श्वान दंश झाल्यावर शासनाला जाग येणार ?

नागरिक मुग गिळून चुप्प 
      शासन मात्र नेहमीप्रमाणे गप्प

वाचा हि २६.०१.२०१६ च्या " लोकसत्ता " या वृत्तपत्रातील बातमी.


माझा या अति भीषण प्रश्नावरील लढा चालूच आहे.

शिवाजीनगरमध्ये पाच मुलांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अंबरनाथ शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत चालली असून रविवारी येथील शिवाजीनगर भागात भटक्या कुत्र्याने पाच लहान मुलांचा चावा घेतल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या घटनेत दोन ते पाच वर्षांच्या मुलांचा समावेश असून या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिवाजीनगर भागात दोन दिवसांपासून एका भटक्या कुत्र्याने दहशत निर्माण केली होती. रविवारी येथील गणपती मंदिराजवळ काव्या इरमाळे ही दोन वर्षांची चिमुरडी आपल्या छोटय़ा दोस्तांसमवेत खेळत होती. तेव्हाच या भटक्या कुत्र्याने तिच्या पायाला व हाताला चावा घेऊन लचका तोडला. या कुत्र्याने या वेळी इतरही लहान मुलांनाही चावा घेतला. मुलांच्या पालकांनी मुलांना तातडीने अंबरनाथ पालिकेच्या छाया रुग्णालयात रेबिज होऊ नये यासाठीचे इंजेक्शन देण्यासाठी धाव घेतली. मात्र, पालिका रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध नसल्याने या पालकांना मुलांना घेऊन तात्काळ बदलापूर ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले.
हा कुत्रा यापूर्वी याच परिसरातील प्राजक्ता गायकर (६) या मुलीच्या डोक्यालाही चावला असून तिच्यासह रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या तीन ते चार जणांना या कुत्र्याने चावा घेतल्याचे येथील नागरिक सचिन गुडेकर यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून तीन हजारांहून अधिक जणांना कुत्रा चावल्याचे पालिकेच्या छाया रुग्णालयातील आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने निर्बीजीकरणाची मोहीम खासगी कंत्राटदारामार्फत चालवली असली तरी पालिकेची ही निर्बीजीकरण मोहीम निव्वळ फार्स असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी या घटनेनंतर पालिकेवर संताप व्यक्त केला आहे.

First Published on January 26, 2016 9:38 am
- See more at: http://www.loksatta.com/thane-news/nomadic-dog-terror-in-ambernath-1194351/#sthash.zqS8dw28.dpuf




Tuesday, January 19, 2016

भटक्या कुत्र्यामुळे विमानची उड्डाणे रोखली गेली - FLIGHTS STOPPED BECAUSE OF STRAY DOG

भटक्या कुत्र्यामुळे विमानची उड्डाणे रोखली गेली.

१८.०१.२०१६ च्या " महारास्त्र टाईम्स " मध्या पृष्ठ क्रमांक २ वरील बातमी येथे देत आहे.

आपल्याला माहीतच असेल कि मी गेली काही वर्षे भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध अश्या वाढणाऱ्या संख्येमुळे मानव प्राण्याला होणाऱ्या त्रासाच्या प्रश्नावर गाली ते दिल्ली लढत आहे.

भटक्या कुत्र्यामुळे आता विमान उड्डाणे रद्द होऊ लागली आहेत .

दुर्दैवाने एखादा विमान अपघात भटक्या कुत्र्यामुळे होईपर्यंत अथवा आदरणीय , माननीय ....... अशी एखादी राजकारणी प्रवास करणाऱ्या VIP , VVIP , VVVVVIP  अश्या व्यक्तीच्या
 विमानाला जो पर्यंत उशीर होत नाहीत तो पर्यंत शासन , प्रशासन काहीच हालचाल करणार नाही .

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet



Monday, January 4, 2016

मुख्यमंत्री साहेब , भटक्या कुत्र्यांपासून आम्हाला वाचवा .- STRAY DOG MENACE in THANE , MAHARASHTRA , INDIA


गेली अनेक वर्षे माझ्या सारखा एक अति सामान्य व हतबल भारतीय नागरिक , या भटक्या कुत्र्यांच्या मानव प्राण्याला होणाऱ्या त्रासाबद्दल व भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध वाढणाऱ्या संख्ये विरुद्ध अथक पणे लढून देखील ना श्वान दंशाच्या घटना कमी होत आहेत, ना भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होत आहे.
यावर एकच इलाज म्हणजे उपोषण .
त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नुकतेच एक पत्र पाठविले आहे. ते जसे च्या तसे " महाराष्ट्र टाईम्स " या वर्तमान पत्राच्या ५.१.२०१६ च्या " ठाणे " पुरवणीत छापून आले आहे. त्याबद्दल मी " महाराष्ट्र टाईम्स " चे मनापासून आभार मानतो. एकच छोटीसी चूक आहे. २०२१ साली ठाणे या शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या सत्तावीस लाख इतकी होणार आहे ती चुकून दोन लाख सत्तर हजार अशी वर्तमान पत्रात छापून आली आहे.
मला १००० % खात्री आहे हि आपल्या शहरात , गावात , गल्लीत , बोळात अगदी आपण राहत असलेल्या रहिवासी संकुलात देखील भटक्या कुत्र्यांचा त्रास होत असणारच. पण आपण नुसती प्रतिक्रिया देत बसलात तर असे गंभीर प्रश्न मार्गी लागणार नाहीत. कृपया " क्रिया " करा . " क्रिया " करण्यासाठी मी आनंदाने मदत / मार्गदर्शन करू शकतो.
लक्ष्यात ठेवा कि आपण अनेक कर भरतो त्यामुळे आपणाला " मानव प्राण्याला " श्वान दंश विरहीत जगण्याचा , रात्री भुंकणे ना ऐकता शांत झोपण्याचा अधिकार आहे.
" भारत " हा असा एकुलता एक देश आहे जेथे " भटक्या कुत्रा " या प्राण्याला , " मानव प्राण्यापेक्षा " जास्त किंमत दिली जाते.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet

सत्यजित अ शाह - ठाणे - ०९८२११५०८५८
एक अतिसामान्य पण जागरूक नागरिक
e-mail : satyajitshah64@gmail.com


Saturday, January 2, 2016

In case of " STRAY DOG BITE " keep quite and wait patiently for another " STRAY DOG BITE " . This happens only in INDIA. STRAY DOGS ARE better treated than HUMANS

नमस्कार , सुंदर दुपार ,

या सोबत आजच्या , म्हणजेच , रविवार, ३.१.२०१६ च्या " महाराष्ट्र  टाईम्स " या वर्तमान पत्रातील पहिल्या पानावर छापून आलेली  बातमी देत आहे.

कृपया वाचा .

आजच्या युगात  , " भारत " नामक देशात  " मानव " नावाच्या प्राण्याला " भटक्या कुत्रा " नावाच्या प्राण्याने चावल्यावर ( श्वान दंश ) सुद्धा भटक्या कुत्र्याची आरती ओवाळावी असे बहुतेक प्राणी मित्रांची इच्छा आहे असे वाटते.

In the article in 'Young India' in 1926, Mahatma Gandhi, the strongest voice on non-violence, had said he favoured killing of dogs "whenever they are a menace to the society".

"A roving dog without an owner is a danger to society and a swarm of them is a menace to its very existence... If we want to keep dogs in towns or villages in a decent manner, no dog should be suffered to wander. There should be no stray dogs even as we have no stray cattle..."But can we take individual charge of these roving dogs? Can we have a pinjrapole for them? If both these things are impossible, then there seems to me no alternative except to kill them," Gandhi had said.

Read more at:  http://www.oneindia.com/india/culling-of-stray-dogs-mahatma-gandhi-s-write-up-quoted-in-sc-1931404.html


मग काय " भारतीय नागरिक " , अजूनही " नागरिक " म्हणून श्वान दंश होण्याची वाट पाहणार का " जागरूक नागरिक " होणार ? 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet


सत्यजित अ शाह - ठाणे

एक अतिसामान्य पण जागरूक नागरिक

Friday, January 1, 2016

समस्त पोलिस बंधू आणि भगिनींना माझा मानाचा सलाम.- HATS OFF TO AL POLICE FORCE

नमस्कार आणि सुंदर सकाळ ,
समस्त पोलिस बंधू आणि भगिनींना २०१६ हे नवीन वर्ष आनंदाचे , चांगल्या आरोग्याचे जाओ हो ईश्वर चरणी प्रार्थना.
आपल्या सगळ्यांच्या सतर्कतेने ३१ दिसेम्बेर , २०१५ ला कोठेही अनुचित प्रकार घडला नाही म्हणून एक अति सामान्य पण जागरूक नागरिक म्हणून मी आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.
आम्हाला आपल्या सगळ्यांच्या कष्टाची पुरेपूर जाणीव आहे.
तुमच्या कष्टाला माझा मानाचा सलाम.
सत्यजित अ शाह - ठाणे
एक अति सामान्य पण जागरूक नागरिक