Please go through the following news appeared in Maharashtra TImes dt. 22nd June, 2010.
It is very much appreciable about this fight of Shri. Sankar Talwar, a common man like you and me.
He is also very busy in his own private limited firm. Most of the time he is travelling all over INDIA because of his business.
Still he fought against one MULTINATIONAL BANK.
HATS OFF TO HIM.
We all should learn from him and do not keep quite against any injustice.
Another thing is that , he is very active member in my FIGHT AGAINST AIR POLLUTION IN RESIDENTIAL AREA.
If each one of us fights against various issue, we all can make noticable changes in various things , in SYSTEMS , etc. etc.
-------------------------------------------------------------------------------
क्रेडिट कार्डधारकाला ग्राहक कोर्टाचा दिलासा
22 Jun 2010, 0322 hrs IST
प्रिंट मेल शेअर सेव प्रतिक्रिया फॉन्ट:
म. टा. प्रतिनिधी
क्रेडिट कार्डाचे आमीष दाखवून ग्राहकांना त्यांचा वापर करायला उद्युक्त करायचे आणि नंतर ग्राहकाकडून पैसे वसूल करताना त्यांना त्रास दिला असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ठाण्यातील एका नागरिकाने 'एचएसबीसी' बँकेला ग्राहक कोर्टात खेचून पुराव्यानिशी चूक निदर्शनाला आणल्याने त्यांना भरपाई तर मिळालीच शिवाय बँकेला त्यांची लेखी माफीही मागावी लागली आहे.
ठाण्यातील कोलशेत रोड येथील 'श्रुती पार्क' सोसायटीत राहणाऱ्या डॉ. शंकरप्पा तलवार यांच्या क्रेडिट कार्डाच्या बिलात बेजबाबदारपणे दंडाची रक्कम दाखवून त्यांना मानसिक त्रास दिल्याबद्दल त्यांनी 'एचएसबीसी' बँकेविरुद्ध ग्राहक मंचापुढे तक्रार केली होती. त्याची मंचाच्या अध्यक्ष एस. बी. धुमाळ आणि ज्योती अय्यर यांच्यापुढे सुनावणी होऊन बँकेने तलवार यांना १२ हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश मंचाने दिले.
गेल्या १० वर्षांपासून तलवार हे या बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असून एप्रिल आणि मे २००७ या दोन महिन्यांमध्ये त्यांना बँकेने क्रेडिट कार्डाचे बिल पाठविले नव्हते. त्याबाबत त्यांनी बँकेकडे विचारणा करूनही बिल धाडण्यात आले नव्हते. त्यानंतर जुलै महिन्यात त्यांना थेट दंडाच्या रकमेसह बँकेने बिल पाठविले. परंतु, 'या प्रकरणात माझा कोणताही दोष नसून मी दंड भरणार नाही', असा पवित्रा तलवार यांनी घेतला होता. बँकेने २२ जुलै रोजी तलवार यांच्या घरी रिकव्हरी एजंट पाठविले. या एजंटांनी दंड वगळता जे ९ हजार ९३६ रुपयांचे बिल होते, ती रक्कम तलवार यांच्याकडून घेतली. 'लेट फी'चा दंड आकारला जाणार नाही, असे आश्वासन या एजंटनी दिले असताना त्यानंतर पुढच्या बिलांमध्ये दंडाची रक्कम येतच होती. त्यामुळे वैतागलेल्या तलवार यांनी डिसेंबर, २००७ मध्ये ग्राहक मंचाकडे बँकेविरुद्ध तक्रार केली. मंचापुढे झालेल्या सुनावणीत तलवार यांना एप्रिल आणि मे महिन्याचे बिल पाठविल्याचा कोणताही सबळ पुरावा बँकेला मंचासमोर सादर करता आला नाही. त्यामुळे बँकेने तलवार यांची मंचासमोरच लेखी माफीही मागितली.
या सर्व प्रकियेत तलवार यांना जो मनस्ताप झाला, त्यापोटी बँकेने त्यांना १० हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी दोन हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये त्यांना द्यावेत, असा आदेश मंचाने दिला आहे. तलवार यांनी तब्बल अडीच वषेर् लढा दिल्यानंतर त्यांना न्याय मिळाला.
--------------------------------------------------------------------------------
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment