Following news is published in Maharashtra Times dt. 14th Dec. 2009. Why such kind of action is not being taken of polluting Ravi Steel, located at Majiwada Junction, Thane West and Shanti Textiles , Kolshet Road, Thane West ?
बोईसरच्या प्रदूषणकारी १५ कारखान्यांचे पाणी तोडले
14 Dec 2009, 0153 hrs IST
:
- म. टा. वृत्तसेवा , पालघर
बोईसर औद्योगिक वसाहतीतील २१ कारखान्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हे कारखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते व त्यानंतर लागलीच अवघ्या ४८ तासांनंतर १५ कारखान्यांचा पाणी पुरवठा महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने खंडित केला आहे.
वीज कंपनीने तातडीने वीज पुरवठा खंडित करण्यास नकार दिला आहे, तर आणखी १०० कारखान्यांवर कारवाई होणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गेल्या काही वर्षांनंतर अशा स्वरूपाची मोठी कारवाई होत असल्याने कारखानदारांत एकच खळबळ उडाली आहे. कारखाने बंद करण्याच्या आदेशात अनुप फार्मा, वसुंधरा डेअरी, निर्भय रसायन, करमतारा इंजिनीअरिंग, जे. बी. टेक्सटाइल, आरती ड्रग, फार्मास्युटिकल प्रॉडक्टस ऑफ इंडिया, झियस इंटरनॅशनल रोल्सन सिंथेटिक्स, विराज प्रोफाइल्स, डिसीटेक्स डेकोअर, कफम्लीन फाईन केमिकल्स, मनोहर प्रोसेसर, डेक्टो टेक्सटाइल, डि-सी-टेक्सटाइल, अंगतपाल इंडस्ट्रीज, निपुर केमिकल्स, सम्राट निटरर्स आदी कंपन्यांचा समावेश आहे.
औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून उत्पादनासाठी वापरले जाणारे पाणी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंदातून 'ओव्हर फ्लो' होत असल्याने तसेच या पाण्याच्या दर्जात सुधारणा होणे, सांडपाणी गोळा करणाऱ्या पम्प क्रमांक ३ला त्याची जोडणी न करणे, समुद व खाडीतील पाण्यात असणारे मासे मृत्युमुखी पडणे, बॉम्बे रेयॉन फॅथन लि. व डि- सी-डेकोअर या कारखान्यांना परवानगी देण्याबाबतीत बोईसर विचार मंचातफेर् तक्रार करण्यात आली होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment