प्रदूषणामुळे डोंबिवलीकर हैराण
18 Sep 2009, 0148 hrs IST
म. टा. प्रतिनिधी
डोंबिवली एमआयडीसीतील विषारी वायू ओकणाऱ्या कंपन्यांमुळे निवासी विभागात राहणाऱ्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून, या कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी एमआयडीसीच्या निवासी विभागातील रहिवासी करत आहेत. याआधीही तेथील रहिवाशांनी आंदोलनाचा पावित्रा घेतल्यानंतर काही प्रमाणात कमी झालेल्या प्रदूषणाने पुन्हा डोंबिवलीकरांना त्रस्त केले आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यापैकी काहींमधून प्रक्रिया न करताच विषारी रासायनिक वायू हवेत सोडला जातो. एरवीही असा वायू सोडला जात असला तरी गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण वाढल्यामुळे निवासी भागात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये काही विकार बळावले आहेत. सदीर्, खोकला, घशाची खवखव, अस्वस्थ वाटण्यासारखे अनेक प्रकार येथील रहिवाशंाना जाणवत असल्याचे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
विशेष करून रात्री १२ वाजेनंतर ते सकाळी पाचपर्यंत हवेत विषारी वायू अधिक प्रमाणात सोडला जात असल्याचा स्थानिकांंचा अनुभव आहे. सकाळपर्यंत घराची बाल्कनी किंवा इमारतीच्या गच्चीवर काळया पावडरचा थर जमा होत असल्याचे दिसून आले आहे. या वायूमुळे आरोग्याच्या तक्रारी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे तेथील रहिवाशांची तक्रार आहे. या वायूमुळे आरोग्य धोक्यात आल्याने त्यावर प्रक्रिया करुन सोडण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन याआधाही मिलापनगर आणि सुदर्शन नगर निवासी संघाच्या वतीने कंपन्यांना देण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात एक तक्रारही कल्याण येथील राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाला करण्यात आली होती.
त्यानंतर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तेथील कंपन्यांवर वॉच ठेवल्यानंतर प्रदूषणाचे प्रमाण खालावले होते. परंतु, आता पुन्हा एकदा हा त्रास जाणवू लागल्याने प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी मिलापनगर रेसिडेन्टस वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजू नलावडे यांनी केली आहे.
दरम्यान, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जीतेंद संगेवार यांना संपर्क साधला असता रसायने घेऊन येणारे काही टँकर एमआयडीसीतील नाल्यांमध्ये ते सोडत असल्याने तेथील रहिवाशांना त्रास होत असावा अशी शक्यता त्यांनी वर्तवली. लोकसहभागाशिवाय या टँकर लॉबीला रोखणे अशक्य असल्याचे सांगत मागील वेळी मंडळाच्या पाहणीत एकही कारखाना प्रदूषण करतांना आढळून आला नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment