जागरूक नागरिक , राज्यपाल नियुक्त आमदार का होऊ शकत नाही ?
दैनिक नवराष्ट्र च्या ४ नोव्हेंबर , २०२० च्या अंकातील बातमी देत आहे
मी , सत्यजित अ शाह , राहणार ठाणे , महाराष्ट्र राज्य , उच्च शिक्षित .
आडनाव अमराठी , पण कोणत्याही मराठी आडनाव असलेल्या व्यक्तीपेक्षा शुद्ध मराठीत संभाषण करतो . मराठी भाषेवरील इंग्रजीच्या अतिक्रमणाविरुद्ध लढतोय .
अनेक सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी लाढलोय , लढतोय , लढणारच .
" आजची सत्यगीतं " हा माझा पहीला वाहिला मराठी कवितांचा संग्रह २०१४ रोजी प्रकाशित झाला आहे .
राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठीच्या प्रत्येक नियमात बसतो .
मी का नाही आमदार होऊ शकत ?
आमदार झालो तर ,
असेल माझा वेगळाच झेंडा
सामाजिक सुधारणा हाच अजेन्डा