Friday, February 7, 2014

Article in LOKSATTA - PRAKASHAN of my 1st KAVYASANGRAHA " AAJCHI SATYAGEETE "

Small article published in Thane Vrutant of LOKSATTA dt. 8th Feb. 2014 about PRAKASHAN of my 1st KAVYASANGRAHA " AaJCHI SATYAGEETE " ठाणे वृत्तान्त “आजची सत्यगीतं” प्रकाशीत आपले स्वातंत्र्य सीमेवर लढणाऱ्या सैन्यामुळे अबाधीत आहे. प्रत्येक भारतीयाने त्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन 'लक्ष्य' फाऊंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी रविवारी ठाण्यात केले. सामाजिक कार्यकर्ते सत्यजीत शहा यांच्या 'आजची सत्यगीतं' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित समारंभात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ कवी अशोक बागवे, माजी आमदार संजय केळकर, ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडिलकर-पांडे, मिलिंद बल्लाळ, प्रा. प्रदीप ढवळ यावेळी उपस्थित होते. ठाण्यातील प्रदुषण, वाहतूक कोंडी, भटके कुत्रे आदी समस्यांवर सातत्याने आवाज उठविणाऱ्या सत्यजीत शहा यांच्या या पहिल्याच संग्रहातील कवितांमध्ये वास्तव परिस्थितीचे चित्रण आहे. शारदा प्रकाशनने प्रकाशीत केलेल्या या काव्य संग्रहाची पहिली आवृत्ती संपेल, हे गृहीत धरून त्यातील दहा टक्के उत्पन्न सत्यजीत शहा यांनी विद्यादान सहाय्यक मंडळास दिले. निधीचा धनादेश समारंभातच संस्थेचे भाऊ नानिवडेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
Copies of " AJCHI SATYAGEETE " are available at MAJESTIC BOOK STALL - Ram Maruti Rd., Thane & Near Shivaji Mandir - Dadar