ठाणे + कोकण
घोडबंदर अजूनही प्रदूषणाच्या कचाट्यात!
25 Nov 2009, 0133 hrs IST
म. टा. प्रतिनिधी
घोडबंदर परिसरातील कंपन्यांमधून होणाऱ्या वायू प्रदूषणाच्या विरोधात येथील रहिवाशांनी लढा उभारला आहे. हे प्रदूषण बंद करण्यासाठी वारंवार आंदोलने केल्यानंतर 'रवी स्टील' या कंपनीच्या विरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुन्हे दाखल केले. मात्र, त्यानंतरही या कंपन्यांमधून होणारे प्रदूषण कायम असून वायू आणि रसायनमिश्रीत पाणी यामुळे येथील रहिवाशांचे जगणे असह्य झाले आहे.
घनदाट वनराईने नटलेला ठाण्यातील घोडबंदरचा परिसर हा एके काळी शुद्ध हवेसाठी परिचित होता. परंतु, झाडांची बेसुमार कत्तल करून येथे काँक्रिटचे जंगल उभे राहिले. बंद झालेल्या कारखान्यांच्या जागांवर टोलेजंग इमारती थाटल्या गेल्या. परंतु, या साऱ्या आक्रमणामुळे घोडबंदर परिसरातील रहिवाशांना शुद्ध हवेसाठी झगडावे लागत आहे. घोडबंदर परिसरातील अनेक कंपन्यांना टाळे लागले असले तरी आजही तेथे अनेक कारखाने सुरू आहेत. त्या कंपन्यांच्या चिमण्यांमधून उत्सजिर्त होणाऱ्या वायूमुळे डोळे चुरचुरणे, मळमळ होणे, उग्र दर्पाच्या वायूमुळे अन्नावरील वासना उडणे असे त्रास रहिवाशांना होत आहेत. 'हाइड पार्क' सोसायटीतील रहिवाशांना असाच त्रास भेडसावत होता. महापालिका, पर्यावरण खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सत्यजित शहा या दक्ष नागरिकाने ही समस्या मागीर् लावली आहे. 'हाइड पार्क'ची समस्या सुटली असली तरी कोलशेत रोड येथील श्रुती पार्क, माजिवडा येथील रुणवाल रिजन्सी आणि ऑकिर्ड, पोखरण रोड नं. २ येथील ओस्वाल पार्क अशा अनेक सोसायट्या या वायूप्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. हे वायू प्रदूषण संपावे, यासाठी भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी दोषी कंपन्यांवर कारवाई करून प्रदूषण कमी करण्याचे आश्वासन आंदोलनर्कत्यांना देण्यात आले हाते. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपन्यांवर गुन्हे दाखल केले असले तरी प्रदूषण मात्र संपलेले नाही, अशी माहिती सत्यजित शहा यांनी दिली.
'रहिवासी संकुले उभी राहण्यापूवीर् या कंपन्या तिथे अस्तित्वात होत्या. त्यामुळे त्यांनी या भागातून स्थलांतर करावे, अशी आमची मागणी नाही. परंतु, कंपन्यांमध्ये प्रदूषणासंबंधीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने रहिवाशांना त्याचा उपदव होत आहे. या कंपन्यांमधून प्रदूषित हवा आणि रासायनिक पदार्थांचे उत्सर्जन होणार नाही, याची काळजी त्यांनी घ्यावी एवढीच अपेक्षा आहे', असे सत्यजित शहा यांनी सांगितले.
Wednesday, November 25, 2009
Subscribe to:
Posts (Atom)