Friday, May 22, 2009

News in Hindustan Times

LOKSATTA
Leading International Marathi News Daily
मंगळवार, १४ एप्रिल २००९


जगण्यासाठी शुद्ध हवा मिळेल का?घोडबंदरवरील रहिवाशांचा आक्रोशठाणे/प्रतिनिधी घोडबंदर रोडवर दुतर्फा नवनवीन गृहनिर्माण संकुलांची उभारणी होत असताना निवासी भागातील कंपन्यांमधून सोडला जाणारा उग्र दर्प असणारा वायू, तसेच रसायनमिश्रित पाण्यामुळे ‘आम्हाला स्वच्छ व ताजी हवा मिळेल का?’ असा आक्रोश करण्याची वेळ त्या भागातील अनेक रहिवाशांवर आली आहे. घोडबंदर रोडवरील ‘हाईड पार्क’ तसेच लगतच्या काही सोसायटय़ांमधील रहिवासी एका कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे हैराण झाले होते. महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्राचे पर्यावरण खाते यांच्याकडे दाद मागूनही त्यांचा प्रश्न सुटला नव्हता. ‘ठाणे वृत्तान्त’ने या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर संबंधित यंत्रणा कामाला लागली. महापौर स्मिता इंदुलकर , आमदार संजय केळकर यांनीही या गंभीर समस्येत लक्ष घातल्याने हा प्रश्न मार्गी लागला.

(सविस्तर वृत्त)
जगण्यासाठी शुद्ध हवा मिळेल का?घोडबंदरवरील रहिवाशांचा आक्रोशठाणे/प्रतिनिधी घोडबंदर रोडवर दुतर्फा नवनवीन गृहनिर्माण संकुलांची उभारणी होत असताना निवासी भागातील कंपन्यांमधून सोडला जाणारा उग्र दर्प असणारा वायू, तसेच रसायनमिश्रित पाण्यामुळे ‘आम्हाला स्वच्छ व ताजी हवा मिळेल का?’ असा आक्रोश करण्याची वेळ त्या भागातील अनेक रहिवाशांवर आली आहे.घोडबंदर रोडवरील ‘हाईड पार्क’ तसेच लगतच्या काही सोसायटय़ांमधील रहिवासी एका कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे हैराण झाले होते. महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्राचे पर्यावरण खाते यांच्याकडे दाद मागूनही त्यांचा प्रश्न सुटला नव्हता. ‘ठाणे वृत्तान्त’ने या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर संबंधित यंत्रणा कामाला लागली. महापौर स्मिता इंदुलकर , आमदार संजय केळकर यांनीही या गंभीर समस्येत लक्ष घातल्याने हा प्रश्न मार्गी लागला.आता पुन्हा अन्य काही कंपन्यांच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारा धूर, रसायनमिश्रित पाण्यामुळे घोडबंदर रोडवरील अनेक रहिवाशांना त्रास सुरू झाला आहे. डोळे चुरचुरणे, मळमळ होणे, उग्र दर्पाच्या वायूमुळे अन्नावरील वासना उडणे अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. सत्यजित शहा (हाईड पार्क), शंकर तलवार (श्रुती पार्क, कोलशेत रोड), सत्यजित आहेर (रुणवाल रिजन्सी, माजिवडा), सुहास पोतनीस (ऑर्किड, माजिवडा), मैथिली चेंदवणकर (ओस्वाल पार्क, पोखरण-२) आदी जागरूक रहिवाशांनी घोडबंदर रोडवरील प्रदूषणाविरोधात लढा सुरू केला आहे. प्रदूषण पसरविणाऱ्या कंपन्यांमुळे कसा त्रास होतो आहे, यासाठी आपापल्या सोसायटय़ांमधून स्वाक्षऱ्या गोळा करण्याची मोहीम या रहिवाशांनी सुरू केली आहे. ‘शुद्ध हवा हवी ’ असा या मंडळींचा नारा आहे.घोडबंदर रोडवरील कंपन्या अनेक वर्षांंपासून अस्तित्वात आहेत. गेल्या दहा वर्षांंत हा भाग झपाटय़ाने विकसित होऊ लागल्याने, नामांकित बिल्डरांनी येथे कोटय़वधींच्या जमिनी विकत घेतल्या. त्यावर मोठमोठे टॉवर्स व टोलेजंग सोसायटय़ा उभ्या राहिल्या. कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या धुरामुळे रहिवाशांना भविष्यात त्रास होऊ शकतो, याची कल्पना असूनही महापालिकेने कंपन्यांलगत निवासी संकुले उभारण्याची परवानगी कशी दिली, असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे. आलिशान गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेतील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी व प्रदूषणाच्या विळख्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
ठाणे + कोकण, मटा फोकस

लढा शुद्घ हवेचा21 May 2009, 0215 hrs IST
- मुंबई टाइम्स टीम, ठाणे
घोडबंदर रोड परिसरातील नागरिकांना तिथे असणाऱ्या कारखान्यांमुळे शुद्ध हवा मिळवण्यासाठी झगडावं लागत आहे. घनदाट वनराईने नटलेला ठाण्यातील घोडबंदरचा परिसर हा एके काळी शुद्घ हवेसाठी परिचित होता. परंतु, झाडांची बेसुमार कत्तल करून इथे काँक्रिटचं जंगल उभं राहिलं. बंद झालेल्या कारखान्यांच्या जागांवर टोलेजंग टॉवर उभे राहिले. या साऱ्या आक्रमणामुळे घोडबंदर परिसरातील रहिवाशांना शुद्घ हवेसाठी झगडावं लागत आहे. निवासी भागातील कंपन्यांमधून सोडला जाणारा वायू आणि रसायनमिश्रित पाणी यामुळे इथल्या लोकांचं जगणं असह्य झालं आहे. त्यामुळेच तिथल्या लोकांना चक्क शुद्घ हवेसाठी लढा उभारावा लागतोय. घोडबंदर रोड परिसरात पूवीर् अनेक कंपन्या होत्या. त्यातल्या बहुसंख्य कंपन्यांना टाळं लागल्यानंतर त्या जागी निवासी संकुलं उभी राहिली असली, तरी आजही या परिसरात अनेक कारखाने सुरू आहेत. त्या कंपन्यांच्या चिमण्यांमधून उत्सजिर्त होणाऱ्या वायुमुळे घोडबंदर रोडवरील अनेक रहिवाशांना त्रास सुरू झाला आहे. डोळे चुरचुरणं, मळमळणं, उग्र दर्पाच्या वायुमुळे अन्नावरील वासना उडणं अशा अनेक तक्रारी या भागातले रहिवासी करू लागले आहेत. हाइड पार्क सोसायटीतल्या रहिवाशांना असाच त्रास भेडसावत होता. महापालिका, पर्यावरण खातं, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सत्यजित शहा या जागरुक नागरीकाने ही समस्या मागीर् लावली आहे. हाइड पार्कची समस्या सुटली असली, तरी कोलशेत रोड इथल्या श्रुती पार्क, माजिवडामधील रुणवाल रिजन्सी आणि ऑकिर्ड, पोखरण रोड नं. २ इथली ओस्वाल पार्क अशा अनेक सोसायट्या या वायू प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्स उभी राहण्यापूवीर् या कंपन्या तिथे अस्तित्वात होत्या. त्यामुळे त्यांनी या भागातून स्थलांतर करावं, अशी आमची मागणी नाही. परंतु, कंपन्यांमध्ये प्रदूषणासंबंधित नियमांची पायमल्ली होत असल्याने रहिवाशांना त्याचा भुर्दंड सोसावा लागतोय. या कंपन्यांमधून प्रदूषित हवा आणि रासायनिक पदार्थांचं उत्सर्जन होणार नाही, याची काळजी त्यांनी घ्यावी एवढीच आमची अपेक्षा असल्याचं शुद्ध हवेच्या लढ्याचे प्रणेते सत्यजित शहा यांचं म्हणणं आहे. योग्य नियमांचं पालन केलं आणि प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण खात्याने त्यांच्यावर अंकुश ठेवला तर ते सहज शक्य आहे. परंतु, हे विभाग आणि ठाणे महापालिका कमालीची उदासीन असल्याने रहिवाशांचा त्रास संपत नसल्याचा आरोप शहा यांनी केला आहे. तसंच, या कंपन्यांमधून बाहेर पडणारी प्रदूषित हवा रोखणं अशक्य असेल, तर त्या कंपन्यांशेजारी निवासी संकुलांना पालिकेने परवानगी कशी काय दिली असा सवालही या निमित्ताने विचारला जात आहे. बेकायदेशीररित्या परवानगी दिली असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही इथल्या रहिवाशांनी केली आहे. ...... एकजुटीचं आवाहन प्रदूषित हवेपासून मुक्तता मिळवण्यासाठी घोडबंदरवासीयांचा एकत्रित लढा उभारण्यास इथल्या काही जागरुक लोकांनी सुरुवात केली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या सोसायट्यांमधून स्वाक्षऱ्या गोळा करण्याची मोहीम सध्या राबवली जात आहे. प्रदूषणाने त्रासलेल्या लोकांना आपल्या प्रतिक्रिया आणि समस्या नोंदवण्यासाठी http:/fightofacommonmanblogspot.com हा ब्लॉगही सुरू करण्यात आला आहे. या लढ्यात सहभागी होण्यासाठी ९८२११५०८५८ या क्रमांकावर किंवा satyajitshah64@gmail.com या इमेलवर संपर्क साधण्याचज् आवाहन करण्यात आल आहे.