Tuesday, March 12, 2024

On Money | Stock Market बद्दल पडलेले प्रश्न | Stock Market | Myth vs Fac...


मराठी माणसाला समभाग गुंतावणीबाबत साक्षर करण्याची  मी  एक निस्वार्थ चळवळ ( SELFLESS MISSION )  सन २०१९/२०२० पासून सुरू केली आहे , त्याचा फायदा आपण देखील  घ्या . व इतरांना देखील त्याविषयी माहिती द्या. आपल्या मदतीने माझी हि चळवळ प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहचविण्यास आवर्जून मदत करा . 

त्याचप्रमाणे महाMoney  या वहिनीला  LIKE , SUBSCRIBE व   COMMENT  करा . 

जय हो । 



Saturday, February 27, 2021

कविता " मी मराठी , मी मराठी "

 

कविता " मी मराठी , मी मराठी "

 

# MIMARATHI ;   # मीमराठी





Wednesday, February 10, 2021

" सत्याग्रही " - सत्यजित

" सत्याग्रही " - सत्यजित 


दीपक शेलार या एका खऱ्या पत्रकाराने , ११ फेब्रुवारी , २०२१ च्या " तरुण भारत " या एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकात छापलेला लेख येथे देत आहे . 

या लेखाचे शीर्षक यथोचित आहे , भाषा  छान आहे , कमी शब्दात भरपूर मांडलं आहे , त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक धन्यवाद . 

माझी भारतीयांना एक नम्र विनंती आहे , ती मी या माझ्या स्वरचित छोट्याश्या कवितेतून व्यक्त केली आहे . 

चला " जागरूक नागरिक " बनूया .

माझ काय जातं हा स्वभाव धर्म सोडूया

चला सर्वांनी मिळून बदल घडवून णूया.

सुदृढ , शक्तिशाली भारत बनवूया .


खालील इंग्रजी पंक्तींप्रमाणे मी वागत असतो .

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

http://fightofacommonman.blogspot.com/




Thursday, November 5, 2020

जागरूक नागरिक , राज्यपाल नियुक्त आमदार का होऊ शकत नाही ?

जागरूक नागरिक , राज्यपाल नियुक्त आमदार का होऊ शकत नाही ? 

दैनिक नवराष्ट्र  च्या ४ नोव्हेंबर , २०२० च्या अंकातील बातमी देत आहे 

मी , सत्यजित अ  शाह , राहणार ठाणे , महाराष्ट्र राज्य , उच्च  शिक्षित . 
आडनाव अमराठी , पण कोणत्याही मराठी आडनाव असलेल्या व्यक्तीपेक्षा शुद्ध मराठीत संभाषण करतो . मराठी भाषेवरील इंग्रजीच्या अतिक्रमणाविरुद्ध लढतोय . 
अनेक सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी लाढलोय , लढतोय  , लढणारच . 
" आजची सत्यगीतं " हा माझा पहीला  वाहिला मराठी कवितांचा संग्रह  २०१४ रोजी प्रकाशित झाला आहे . 

राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठीच्या  प्रत्येक नियमात बसतो . 
मी का नाही आमदार होऊ शकत ? 

आमदार झालो तर , 

असेल माझा  वेगळाच झेंडा 
सामाजिक सुधारणा  हाच अजेन्डा  

# राज्यपाल नियुक्त आमदार   # SATYAJITASHAH # COMMONMAN



Wednesday, October 7, 2020

" ठाणे भूषण " एक खड्डा

 " ठाणे भूषण "

दर वर्षी ठाणे शहरात , ठाणे महानगरपालिका बहुतेक १ ऑक्टोबर रोजी अनेक ठाणेकरांना " वशिल्याचे " अनेक पुरस्कार देत असते .

यावर्षी दुर्दैवाने कोरोना मुळे हे पुरस्कार दिले गेलं नाहीत .जर ते दिले गेले असते , तर त्यातील मानाचा असा " ठाणे भूषण " हा पुरस्कार "ठाणे " या एका चलाख शहरातील ( SMARTCITY ) या छायाचित्रात दिसणाऱ्या रस्त्यावरील एखाद्या देशाच्या नकाश्यासारख्या दिसणाऱ्या अतिविशाल खड्डयाला मिळाला असता .

हा खड्डा कळवा सेतूवरून ( KALWA BRIDGE ) ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाकडे जुन्या पुणे - मुंबई मार्गाने जाताना ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या अगदी जवळील रस्त्यावर गेली अनेक महिने दिमाखाने पहुडलेला आहे . खड्ड्यामुळे मूळ रस्ता देखील स्पष्ट्पणे दिसून येतो .

गम्मत म्हणजे या रस्त्यावरून ठाणे शहरातील अनेक आदरणीय , माननीय , वंदनीय , पूजनीय , . . . . . . . . . लोकप्रतिनिधी अनेकदा येजा करीत असतात , पण बहुतेक त्यांना हा नकाशा म्हणजे जणू मूळ रस्ताच वाटत असावा त्यामुळे त्यांचे या खड्डयाकडे लक्ष्य गेले नसावे .

मला मात्र हा एक खड्डा वाटतो , म्हणजेच माझी नजर बहुतेक वाईट असावी .

असंख्य ठाणेकर दरवर्षी अनेक खड्ड्यांमधून जातात , पण याविरोधात आवाज उठविण्यात मात्र कमीपणा मानतात.

असो , पण माझे एकट्याचे प्रयत्न मात्र कमी पडतात.

या सोबत " महाराष्ट्र टाईम्स " च्या ७ ऑक्टोबर , २०२० च्या अंकातील एक छोटीशी बातमी वज तळमळ येथे देत आहे .

# ठाणे भूषण , # POTHOLESTHANE